माजी IAS अधिकाऱ्याला साडेचार लाखांना गंडवलं, दोन आरोपी अटकेत
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी माजी IAS अधिकारी अशोक बसक यांना ऑनलाईन फ्रॉडमध्ये साडेचार लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना आरोपींनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ७८ वर्षीय बसक हे आपल्या विमानाची तिकीटं ऑनलाईन कॅन्सल करत असताना त्यांना हा गंडा घालण्यात आल्याचं कळतंय. मिळालेल्या माहितीनुसार बसक यांनी […]
ADVERTISEMENT
– देव कोटक, मुंबई प्रतिनिधी
ADVERTISEMENT
माजी IAS अधिकारी अशोक बसक यांना ऑनलाईन फ्रॉडमध्ये साडेचार लाखांचा गंडा घालणाऱ्या दोघांना आरोपींनी अटक केली आहे. या प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ७८ वर्षीय बसक हे आपल्या विमानाची तिकीटं ऑनलाईन कॅन्सल करत असताना त्यांना हा गंडा घालण्यात आल्याचं कळतंय.
मिळालेल्या माहितीनुसार बसक यांनी आपल्या विमानाची तिकीटं रद्द करण्यासाठी ट्रॅव्हल एजंटला फोन केला होता. यानंतर ट्रॅव्हल एंजटने बसक यांचा फोन नंबर इतर दोघांना फॉरवर्ड करत बसक यांना एक Mobile App डाऊनलोड करायला सांगितलं. या माध्यमातून नंतर दोन्ही आरोपींनी बसक यांच्या खात्यातील साडेचार लाखांची रक्कम पळवली.
हे वाचलं का?
नर्सला लग्नाचं आमिष दाखवून २ लाख उकळले, बोगस डॉक्टर मुंबई पोलिसांच्या जाळ्यात
पोलिसांनी या प्रकरणात कौशल शहा आणि सागर कर्माकर या आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही आरोपी पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद जिल्ह्याचे राहणारे आहेत. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही आरोपींना अटक करत न्यायालयासमोर हजर केलं आहे. ज्यानंतर दोघांनाही २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या प्रकरणातील मुख्य सुत्रधार हा झारखंडचा असून तो फरार असल्याचं कळतंय. आरोपी कौशल आणि सागर हे पश्चिम बंगालमध्ये सिम कार्डाचा बिजनेस करत असून गावातील गरीब व्यक्तींच्या नावाने सिम कार्ड देत फसवणुकीसाठी त्याचा उपयोग करायचे. पोलिसांनी तांत्रिक सहाय्याच्या जोरावर या आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
बायकोचा मटण बनवायला नकार, पठ्ठ्याने थेट पोलिसांनाच फोन लावला आणि मग…
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT