ठाण्यातील दुर्दैवी घटना : पाण्याची टाकी धुण्यासाठी उतरलेल्या दोघांचा मृत्यू
पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना आज घडली. ठाण्यातील नौपाडा येथील हरिनिवास परिसरात ही घटना घडली आहे. मराठा सेवा मंडळ इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला होता. या केमिकल मुळे दोघांना आपला जीव गमावावा लागला. ठाण्यातील नौपाडा येथील हरीनिवास परिसरातील मराठा सेवा मंडळ या इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची […]
ADVERTISEMENT
पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी उतरलेल्या दोन मजुरांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना आज घडली. ठाण्यातील नौपाडा येथील हरिनिवास परिसरात ही घटना घडली आहे. मराठा सेवा मंडळ इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला होता. या केमिकल मुळे दोघांना आपला जीव गमावावा लागला.
ADVERTISEMENT
ठाण्यातील नौपाडा येथील हरीनिवास परिसरातील मराठा सेवा मंडळ या इमारतीच्या गच्चीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी चार जणांनी कंत्राट घेतला होता. या ठिकाणी पाण्याची टाकी साफ करण्यासाठी आणि पाण्याच्या टाकीच्या आतील बाजूचे शेवाळ काढण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला. यावेळी एसबीएस या केमिकलचा वापर केला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
काही वेळाने दोन जण पाण्याची टाकी धुण्यासाठी आत उतरले. मात्र केमिकलमुळे दोघांचा श्वास गुदमरण्यास सुरूवात झाली. त्यानंतर त्यांना बाहेर निघता आलं नाही. त्या दोघांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या साथीदारांनी प्रयत्न केले. पाण्याच्या टाकीच्या झाकणाच्यावर मोबाईल टॉवर असल्यामुळे बाहेर निघता येत नव्हते आणि ते दोघेही आतच अडकून पडले.
या घटनेची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्या चौघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना देखील केमिकलमुळे गुदमरु लागलं. त्यामुळे चौघांना बाहेर काढण्यास अपयश आलं आणि अखेर अग्निशमन दलाल पाचारण करण्यात आले.
हे वाचलं का?
अग्निशमन दलाने शिडी आणि ऑक्सिजन बाटल्याच्या मदतीने आत उतरून या चारही जणांना बाहेर काढले. विवेक कुमार (वय ३०), योगेश नरवनकर (वय ३६), मिथुन कुमार ओझा (वय ३०), गणेश नरवनकर (वय ३८) अशी या चार जणांची नावं आहेत.
या चौघांपैकी विवेक कुमार आणि योगेश नरवनकर या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर इतर दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती ठाणे नौपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT