India Ukraine Business: युक्रेन भारताकडून ‘या’ वस्तू करतो खरेदी, युद्ध झालं तर..?
India-Ukraine Bilateral Trade: अलीकडील घडामोडींनंतर युक्रेनवरील (Ukraine) युद्धाची परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. रशियाने (Russia) पूर्व युक्रेनला (Eastern Ukraine) वेगळा देश म्हणून मान्यता दिली असून त्यानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. सोव्हिएत युनियन (Soviet Union) आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध (Cold War) संपल्यानंतर पहिल्यांदाच युद्धाचा धोका एवढा गंभीर झाला असल्याचे सामरिक घडामोडींचे तज्ज्ञ सांगत […]
ADVERTISEMENT

India-Ukraine Bilateral Trade: अलीकडील घडामोडींनंतर युक्रेनवरील (Ukraine) युद्धाची परिस्थिती शिगेला पोहोचली आहे. रशियाने (Russia) पूर्व युक्रेनला (Eastern Ukraine) वेगळा देश म्हणून मान्यता दिली असून त्यानंतर अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. सोव्हिएत युनियन (Soviet Union) आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्ध (Cold War) संपल्यानंतर पहिल्यांदाच युद्धाचा धोका एवढा गंभीर झाला असल्याचे सामरिक घडामोडींचे तज्ज्ञ सांगत आहेत. या धोक्याचा सर्वात वाईट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर होत आहे. जी कोव्हिड महामारीमुळे आधीच बिघडलेली आहे. युद्धाच्या या संकटापासून भारतही अस्पर्शित नाही आणि त्याचा देशाच्या आयात-निर्यातीवर वाईट परिणाम होऊ शकतो.
तिसऱ्या महायुद्धाचा धोका
युक्रेन संकटावर तोडगा काढण्यासाठी रशिया आणि अमेरिका यांची एक बैठक होणार होती. मात्र, प्रस्तावित बैठक झालीच नाही. मंगळवारी सकाळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russia President Vladimir Putin) यांनी पूर्व युक्रेनमधील Donetsk आणि Lugansk या दोन प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लादण्याची घोषणा केली. या आक्रमक कारवायांमुळे युद्धाचा धोका इतका वाढला आहे की आता लोकांना तिसऱ्या महायुद्धाची (3rd World War) भीती वाटू लागली आहे.
युद्ध झाले तर भारतालाही धोका










