अज्ञात मारेकऱ्याने केली 58 वर्षीय महिलेची हत्या, डोंबिवलीतली धक्कादायक घटना
डोंबिवलीतल्या टिळक चौक भागातील आनंदशीला सोसायटीत शिरून एका अज्ञात मारेकऱ्याने 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. आनंद शीला या सोसायटीत ही महिला राहात होती. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे. विजया बावीस्कर […]
ADVERTISEMENT

डोंबिवलीतल्या टिळक चौक भागातील आनंदशीला सोसायटीत शिरून एका अज्ञात मारेकऱ्याने 58 वर्षीय महिलेची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत घडली आहे. या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. आनंद शीला या सोसायटीत ही महिला राहात होती. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात मारेकऱ्याचा शोध सुरू करण्यात आला आहे.
विजया बावीस्कर (वय-58) असे हत्या झालेल्या या महिलेचे नाव आहे. विजया बावीस्कर या टिळक नगर चौकातील आनंद शीला या सोसायटीच्या एका घरात एकट्याच राहत होत्या. रात्रीच्या सुमारास घरात घुसून या महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. त्यातच सकाळी घरकाम करणारी महिला मृतक विजया यांच्या घरात आली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यानंतर शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती टिळक नगर पोलीस ठाण्याला दिली असून पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत विजया यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या शासकीय रुग्णालयात रवाना केला.