Shinde-BJP मध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’ला ठिणगी? श्रीकांत शिंदेंचा मतदारसंघ पुन्हा टार्गेटवर!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Union Minister Anurag Thakur in Kalyan Lok Sabha Constituency :

ADVERTISEMENT

कल्याण : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) पुन्हा एकदा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर (Kalyan Lok Sabha Constituency) येत आहेत. केंद्रीय मंत्री लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेंतर्गत ते १४ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय कल्याण दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते कार्यकर्त्यांची संवाद साधणार आहेत, अशी माहिती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर (Sanjay Kelkar) यांनी दिली. दरम्यान, यापूर्वी सप्टेंबर २०२२ मध्येही अनुराग ठाकुर यांनी तीन दिवसांचा दौरा केला होता. (Kalyan Lok Sabha Constituency is considered stronghold as Chief Minister Eknath Shinde’s son MP Dr. Srikant Shinde)

कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा बालेकिल्ल्ला मानला जातो. सलग दोन वेळा ते इथून मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असं असतानाच डॉ. शिंदे यांच्या मतदारसंघात भाजपने लक्ष केंद्रित करत शत-प्रतिषतचा नारा दिल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क लावले जात आहेत. ठाकूर यांच्या कल्याण लोकसभा दौऱ्यामुळे या जागेवरुन भाजप दावा करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

हे वाचलं का?

Ramesh Bais : झारखंडमध्ये सरकारशी संघर्ष; महाराष्ट्रात काय होणार?

याबाबत बोलताना कल्याण मतदारसंघाचे प्रभारी संजय केळकर यांनी मात्र सावध पवित्रा घेतला आहे. भाजपने ज्या १८ जागा निवडल्या त्या जागा पूर्ण बळकट करण्याचे प्रयत्न आहेत. भाजप आणि शिंदेंच्या सेनेमध्ये अतिशय अंडरस्टँडिंग आहे. मुळात लोकसभेच्या जागा भाजपच्या दृष्टीने सक्षम केल्याच पाहिजे. पण शेवटी केंद्रातील आणि राज्यातील पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. सक्षमपणे आपण लढलो पाहिजे किंवा जिंकलो पाहिजे, मतदारसंघ कोणाला जाणार? आणि कोण उभं राहणार? हा निर्णय नेतृत्व करेल, असंही त्यांनी सांगितलं.

ADVERTISEMENT

Ramesh Bais: नगरसेवक ते महाराष्ट्राचे राज्यपाल, कोण आहेत रमेश बैस?

ADVERTISEMENT

१६ मतदार संघामध्ये भाजपचं लक्ष

केंद्रीय मंत्री लोकसभा मतदारसंघ प्रवास योजनेंतर्गत भाजपनं राज्यात १६ मतदार संघ निवडले आहेत. यात आगामी निवडणुकीत भाजपला विजय मिळवायचा आहे. यामध्ये बारामती, सातारा, कल्याण-डोंबिवली, बुलढाणा, शिरुर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले अशा मतदार संघांच्या समावेश आहे. विशेष म्हणजे मिशन ४५ अंतर्गत टार्गेट केलेल्या अनेक मतदार संघांमध्ये शिंदे गटाचे खासदार आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT