ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन; मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अल्पशा आजाराने वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानाहून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी त्यांना आदारांजली अर्पण केली. पाच दशकं […]
ADVERTISEMENT
ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचं निधन झालं आहे. चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांच्या जाण्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अल्पशा आजाराने वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा निरोप घेतला. कोल्हापूरमधील कळंबा शिवप्रभू नगर येथील निवासस्थानाहून सकाळी साडेअकरा वाजता अंत्ययात्रेस सुरुवात होणार आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनेकांनी त्यांना आदारांजली अर्पण केली.
ADVERTISEMENT
पाच दशकं केले काम
गेली पाचहून अधिक दशकं मराठी चित्रपट सृष्टी मध्ये कार्यरत आहात शेरास सव्वाशेर या 1965 मधील मराठी चित्रपटापासून आपली कारकीर्द सुरू झाली आणि आपण आजपर्यंत जवळजवळ 250 हून अधिक चित्रपटांमध्ये चरित्र नायक खलनायक इत्यादी विविधरंगी भूमिका वठवल्यात. त्यांनी आत्तापर्यंत व्ही शांताराम, भालजी पेंढारकर, अनंत माने, कमलाकर तोरणे यांच्यापासून ते महेश कोठारे यांच्यासारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले.
प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं निधन; बॉलिवूडवर शोककळा
हे वाचलं का?
गाजलेल्या भूमिका
कुलकर्णी यांच्या काही चित्रपटांपैकी विशेष गाजलेल्या भूमिका एक गाव बारा भानगडी, सुगंधी कट्टा, दगा, कराव तसे भरावे, चंदनाची चोळी अंग अंग जाळी धूम धडाका या चित्रपटांमध्ये दिसून येतात. त्यांनी काही चित्रपटांचे गीत लेखनही केले आहे. तसेच दुरितांचे तिमिर जावो सारख्या कौटुंबिक नाटकांमधून भूमिका साकारत असताना सुद्धा हवालदार भोळा बाईवर डोळा सारखी लोकनाट्य सुद्धा त्यांनी गाजवून सोडली होती. आपल्या मी एक शिक्षक एक विदूषक या एकपात्री नाट्यप्रयोगाचे त्यांनी आजपर्यंत जवळजवळ 1000 प्रयोग केले आहेत. तसेच त्यांनी स्वतःची मधु थिएटर्स ही नाट्य संस्था पंधरा वर्षे अविरतपणे चालवली होती.
शो मस्ट गो ऑन! वडिलांच्या निधनाची बातमी कळल्यानंतरही किशोर महाबोले यांनी केला सीन पूर्ण
ADVERTISEMENT
भालचंद्र कुलकर्णी हे मराठी चित्रपट महामंडळ या संस्थेच्या उन्नतीसाठी झटणारे कार्यकर्ते होते. तसेच या महामंडळाच्या सचिव पदाची जबाबदारी जवळजवळ पंधरा वर्षे त्यांनी सांभाळली. त्यांनी प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये 35 वर्षे अविरतपणे ज्ञानदानाचे काम केले व याच संस्थेतून ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले. त्यांनी या सर्व प्रवासामध्ये कोल्हापूरचे नाव सतत झळाळत ठेवले होते. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं. ‘झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, अशा ३०० पेक्षा चित्रपटांत त्यांनी काम केले होते. १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
ADVERTISEMENT
अभिनेते सतीश कौशिक यांचा मृत्यू कशामुळे झाला?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT