वीर सावरकर जयंतीच्या शुभेच्छा देताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी आणि परराष्ट्र मंत्र्यांनी काय चूक केली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती 28 मे रोजी पार पडली. मात्र यादिवशी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना वीर सावरकरांचं नाव विनायक होतं याचाच विसर पडला. जगत प्रकाश नड्डा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी वीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारं जे ट्विट केलं त्या ट्विटमध्ये दामोदर सावरकर असं नाव लिहिलं. त्यांचं संपूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर होतं. दामोदर सावरकर हे वीर सावरकर यांचे वडील होते. मात्र जगत प्रकाश नड्डा यांनी वीर दामोरदर सावरकर असा उल्लेख करून ट्विट लिहिलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हणाले आहेत जे.पी. नड्डा ट्विटमध्ये?

महान क्रांतीकारी आणि प्रखऱ देशभक्त, चिंतक, विचारवंत, लेखक, साहित्यित स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना शत् शत् नमन. राष्ट्राच्या प्रति आपलं सर्वस्व अर्पण करणारे वीर सावरकर हे युगानुयुगे आमच्या प्रेरणेच्या केंद्रस्थानी राहतील.

हे वाचलं का?

विशेष बाब म्हणजे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही वीर दामोदर सावरकर असंच नाव लिहून त्यांच्या जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. वीर सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे त्यांचं योगदान आपल्याला विसरून चालणार नाही असं कायम म्हणणाऱ्या भाजपला वीर सावरकर यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांच्या नावाचाच विसर पडल्याचं दिसून आलं आहे.

ADVERTISEMENT

जे. पी. नड्डा यांनी केलेल्या ट्विटवर अनेकांनी रिप्लाय केला आहे. मात्र वीर सावरकर यांच्या नावात काय चूक केली आहे हे रिप्लाय करणाऱ्या भाजपच्या लोकांना लक्षातही आलेलं नाही. जी बाब जे. पी. नड्डा यांच्या ट्विटची तीच बाब एस जयशंकर यांच्याही ट्विटची. त्यांच्या ट्विटवर काही युजर्सनी त्यांना हे सांगितलं की सर आपण वीर सावरकर यांचं पहिलं नाव लिहिलेलं नाही. तरीही त्यांनी ही चूक सुधारलेली नाही. त्यामुळे वीर सावरकरांची महती कायम सांगणाऱ्या भाजपलाच त्यांच्या नावाचाही विसर पडला आहे का? अशी चर्चा आता ट्विटर आणि सोशल मीडियावर रंगली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT