iPhone वरून अँड्रॉइडवर WhatsApp चॅट हिस्ट्री करता येणार ट्रान्सफर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

व्हॉट्स प्रत्येकाच्याच आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनलं आहे. पासवर्डपासून ते महत्त्वाच्या अनेक गोष्टी आणि प्रिय लोकांसोबतचं चॅट्स अनेक जण जपून ठेवतात.

हे वाचलं का?

पण फोन बदलताना मोजक्याच फोनमध्ये WhatsApp चॅट हिस्ट्री मुव्ह करण्याची सोय होती. जर एखाद्याला iPhone बदलून अँड्रॉइड फोन वापरायचा असेल, तर चॅट हिस्ट्री मुव्ह करण्याची सोयच नव्हती.

ADVERTISEMENT

आता iPhone वरून अँड्रॉइड फोनवर आपले चॅट्स मूव्ह करता येणार आहेत.

ADVERTISEMENT

आता पर्यंत हे फीचर फक्त Samsung च्या लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये होते.

आता Pixel फोनवर सुद्धा तुम्हाला हे फीचर वापरता येणार आहे. Android 12 सोबत लाँच करण्यात आलेल्या फोनमध्ये देखील हे फीचर कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलं आहे.

WhatsApp च्या टीम सोबत काम करून कॅपेबिलिटी तयार करण्यात आली आहे. या डिझाईनमुळे iPhone वरून अँड्रॉइड फोनवर WhatsApp चॅट हिस्ट्री ट्रान्सफर करता येऊ शकते, असं गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे.

iPhone वरून अँड्रॉइड फोनवर चॅट हिस्ट्री मूव्ह करण्यासाठी तुम्हाला USB-C to Lightning केबलची गरज असते. त्यानंतर तुम्हाला फोन कनेक्ट करावे लागतील.

नवीन अँड्रॉइड डिव्हाईसला सेटअप करताना प्रांप्ट मिळेल.

तुम्हाला तुमच्या आयफोनवर एक QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यावरून WhatsApp लाँच होईल. त्यानंत सर्व चॅट्स अँड्रॉइड डिव्हाईसवर मूव्ह करता येईल. ही प्रक्रिया डेटा सुरक्षितत असणार आहे.

चॅट हिस्ट्री मूव्ह करण्याचं हे फीचर आता सॅमसंगच्या निवडक फोनसोबत आता Pixel फोनसाठी देखील उपलब्ध करण्यात आलं असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT