Mumbai Local कधी सुरू होणार? विजय वडेट्टीवार म्हणतात…
सध्या राज्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसते आहे. अशात मुंबई लोकल कधी होणार हा प्रश्न विचारला जातो आहे. आजच देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रसारमाध्यमांकडून विचारलं गेलं त्यावेळी ते म्हणाले की, ‘मुंबई लोकल सुरू झाली पाहिजे हे माझं मत आहे पण तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारत आहात.’ अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन […]
ADVERTISEMENT
सध्या राज्यात कोरोनाची लाट ओसरताना दिसते आहे. अशात मुंबई लोकल कधी होणार हा प्रश्न विचारला जातो आहे. आजच देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रसारमाध्यमांकडून विचारलं गेलं त्यावेळी ते म्हणाले की, ‘मुंबई लोकल सुरू झाली पाहिजे हे माझं मत आहे पण तुम्ही चुकीच्या माणसाला प्रश्न विचारत आहात.’ अशी एका ओळीची प्रतिक्रिया दिली. तर दुसरीकडे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उत्तर दिलं आहे.
ADVERTISEMENT
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
सध्याच्या एकूण परिस्थितीमध्ये कोरोनाची दुसरी लाट अजून संपूर्णपणे ओसरलेली नाही तिसरी लाट येईल अस तज्ञांचं मत आहे. त्यामुळे मुंबईच्या लोकलबाबत फार विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. राज्य अजून सुद्धा पूर्णपणे कोरोनामुक्त झालेले नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत मुंबई लोकल सुरू करण्याबाबत फार विचारपूर्वक निर्णय करावा लागणार आहे. मुख्यमंत्री तज्ञ सदस्यांचा सल्ला घेऊन योग्य तो निर्णय याबाबत जाहीर करतील असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
विजय वडेट्टीवार यांनीही आधी याबाबत भाष्य केलं होतं. कोरोना संपूर्ण संपत नाही तोपर्यंत मुंबईची लोकल सुरू होणार नाही असं त्यांनी म्हटलं होतं. आता त्यांनी याबाबत मुख्यमंत्री तज्ज्ञांशी चर्चा करून याबाबत निर्णय जाहीर करतील असं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. मुंबईत कोरोना रूग्ण संख्या कमी झाली आहे. दुसऱ्या लाटेची सुरूवात साधारण फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात झाली. त्यानंतर एप्रिल महिन्यात मुंबईतली एका दिवसातली रूग्णसंख्या 11 हजार रूग्ण एका दिवशी इतकं वाढलेलं दिसलं जे प्रमाण आता साधारण 500 वर आलं आहे. तसंच मुंबईचा रिकव्हरी रेट हा देखील 96 टक्के झाला आहे. अशात आता मुंबई लोकल नेमकी कधी सुरू होणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. पण पहिल्या लाटेनंतर जेव्हा लोकल सगळ्यांसाठी सुरू झाली त्यानंतरच कोरोनाचं प्रमाण वाढलं आणि दुसरी लाट आली.
सध्या राज्यात डेल्टा व्हेरिएंटचा धोका आहे आणि तिसरी लाट येण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे राज्यात लेव्हल थ्रीचे निर्बंध आहेत. अशात मुंबई लोकल सुरू होणार का असा प्रश्न विचारला जात असला तरीही मुंबई लोकल इतक्यात सुरू होण्याची चिन्हं नाहीत असेच संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT