पद्म पुरस्कार नाकारणारे बुद्धदेव भट्टाचार्य आणि संध्या मुखर्जी आहेत तरी कोण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पश्चिम बंगलाचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य आणि प्रसिद्ध गायिका संध्या मुखर्जी या दोघांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. मोदी सरकारने बुद्धदेव भट्टाचार्य यांना पद्म भूषण आणि संध्या मुखर्जी यांना पद्म श्री हे पुरस्कार देऊन त्यांचा गौरव कऱण्याचा निर्णय घेतला होता. मात्र या दोघांनीही हा पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. त्यावरून देशभरात चर्चा होते आहे.

ADVERTISEMENT

बुद्धदेव भट्टाचार्य यांनी इंडिया टुडेशी बोलताना हे स्पष्ट केलं की त्यांना असा काही पुरस्कार दिला जाणार आहे याबाबत काहीही माहिती दिली गेली नाही. तर संध्या मुखर्जी यांच्या कन्या सौमी सेनगुप्ता यांनी सांगितलं की 90 व्या वर्षी माझ्या आईसारख्या (संध्या मुखर्जी) ज्येष्ठ गायिकेला पद्म श्री देणं ही अपमानास्पद वागणूक आहे. पद्म पुरस्कार हे देशातल्या सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक मानले जातात. अशात या दोन्ही दिग्गजांनी हे पुरस्कार नाकारले आहेत. आपण जाणून घेऊ हे दोघे कोण आहेत.

माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य, संध्या मुखर्जीं यांनी नाकारला ‘पद्म’ पुरस्कार

हे वाचलं का?

कोण आहेत बुद्धदेव भट्टाचार्य?

बुद्धदेव भट्टाचार्य हे पश्चिम बंगालचे 2000 ते 2011 या कालावधीत म्हणजेच अकरा वर्षे मुख्यमंत्री होते. ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत. त्यांचा जन्म 1 मार्च 1944 ला कोलकाता या ठिकाणी झाला. त्यांचं वडिलोपार्जित घर हे बांगलादेशात आहे. बुद्धदेव भट्टाचार्य यांनी कोलकाता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमधून बांगला साहित्याचं शिक्षण घेतलं. बांगला ऑनर्समध्ये त्यांनी बीए ही पदवीही घेतली. त्यानंतर 1966 मध्ये ते सीपीएम म्हणजे कम्युनिस्ट पक्षाशी जोडले गेले. ते माकपाचे युथ डेमिक्रेटिक युथ फेडरेशनचे सचिव म्हणूनही तेव्हा निवडले गेले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

1977 मध्ये त्यांनी उत्तर कोलकाता येथील कोसीपोरवरून पहिली विधानसभा निवडणूक लढवली. 6 नोव्हेंबर 2000 ला ज्योती बसुंच्याऐवजी बुद्धदेव भट्टाचार्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री झाले. बंगालमध्ये औद्योगिकीकरणाची सुरूवात करणारे मुख्यमंत्री अशी त्यांची ओळख आहे. टाटाच्या नॅनो प्लांटला सिंगूरमध्ये त्यांनी संमती दिली होती.

2011 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींनी डाव्यांचा सुपडा साफ केला. त्यामुळे 34 वर्षे डाव्यांकडे असलेली सत्ता तृणमूलच्या हाती गेली. बुद्धदेव भट्टाचार्य यांचाही त्या निवडणुकीत पराभव झाला. पश्चिम बंगालमध्ये डाव्या विचारांशी समरस झालेले ते अखेरचे मुख्यमंत्री ठरले.

कोण आहेत संध्या मुखर्जी?

संध्या मुखर्जी यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1931 ला कलकत्ता (आताचं कोलकाता) या ठिकाणी झाला. त्यांचे वडील रेल्वे अधिकारी होते. संध्या त्यांच्या सहा बहीण-भावांपैकी सर्वात लहान आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरूवात हिंदी सिनेमांमधल्या गाण्यांतून केली होती. 1950 मध्ये आलेल्या तराना या सिनेमात त्यांनी गाणी म्हटली होती. 1952 मध्ये काही खासगी कारणामुळे त्या कोलकाता या ठिकाणी परतल्या. 1966 मध्ये त्यांनी बंगाली कवी श्यामल गुप्ता यांच्याशी लग्न केलं.

संध्या मुखर्जी या 60 आणि 70 च्या दशकातल्या सर्वात यशस्वी आणि मधुर आवाजाच्या गायिका होता. त्यांनी आतापर्यंत हजारो बंगाली गाणी म्हटली आहेत. संध्या आणि हेमंत मुखर्जी यांच्या गाण्यांची आठवण आजही लोकांच्या मनात कायम आहे. 2011 मध्ये संध्या मुखर्जी यांना पश्चिम बंगालचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेला बंग विभूषण हा पुरस्कार मिळाला. जय जयंती नावाच्या एका बंगाली सिनेमासाठी त्यांना 1970 मध्ये सर्वोत्कृष्ट महिला पार्श्व गायिका हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT