कधी काळी चालवायचे रिक्षा! कोण आहेत एकनाथ शिंदे, ज्यांच्यामुळे ठाकरेंचं सरकार आलंय संकटात?
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अवघ्या काही तासांत देशभरात पोहोचले. हिंदुत्वाची कास धरत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आहे. सध्या सुरतमध्ये असलेल्या शिंदेंच्या बंडामुळे, मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता बळावली आहे. सेनेचे निष्ठावंत असलेले शिंदे यांची अचानक केलेल्या बंडखोरीमुळे प्रकाश झोतात आले आहेत…उद्धव ठाकरे हे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करत आहेत. एकनाथ […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे अवघ्या काही तासांत देशभरात पोहोचले. हिंदुत्वाची कास धरत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंडाचं निशाण फडकावलं आहे. सध्या सुरतमध्ये असलेल्या शिंदेंच्या बंडामुळे, मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता बळावली आहे. सेनेचे निष्ठावंत असलेले शिंदे यांची अचानक केलेल्या बंडखोरीमुळे प्रकाश झोतात आले आहेत…उद्धव ठाकरे हे त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न करत आहेत.
एकनाथ संभाजी शिंदे… जन्म 9 फेब्रुवारी 1964. ठाणे जिल्ह्यातील अहिर या गावात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या कुटुंबात एकनाथ शिंदेंचा जन्म झाला. एकनाथ शिंदे यांच्या वडिलांनी रोजगार मिळवण्यासाठी गावावरून ठाणे गाठले.
घरची परिस्थिती बेताचीच असल्याने एकनाथ शिंदेंना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. शिक्षण सोडून शिंदेंनी मग मासळी बाजारात काम सुरू केलं. त्याबरोबर वडिलांनी घेतलेला टँम्पो चालवला. परिस्थितीशी दोन हात करत असलेल्या शिंदेंनी काही वर्ष रिक्षाही चालवली.
एकनाथ शिंदे यांचा असा संघर्ष सुरू असताना त्या काळात ठाण्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. शिवसेना मुंबई बाहेर पडत होती. त्यावेळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी शिवसेनेच्या झेंड्याखाली जमा होत होती.
