तीन कारणांमुळे शेअर बाजारात भूंकप; दोन दिवसांत बुडाले १२ कोटी
व्हॅलेंटाईन डेचा सोमवार शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरला. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE Sensex) तब्बल १,७४७.०८ अंकांनी घसरून ५६,४०५.०८ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (NSE Nifty) ५३१.९५ अंकांनी घसरून १६,८४२.८० अंकांवर बंद झाला. बीएसई आणि एनएसई मध्ये गेल्या वर्षभरात झालेली सर्वात मोठी घसरून असून, गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे १२.४३ कोटी […]
ADVERTISEMENT
व्हॅलेंटाईन डेचा सोमवार शेअर बाजारासाठी ब्लॅक मंडे ठरला. सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (BSE Sensex) तब्बल १,७४७.०८ अंकांनी घसरून ५६,४०५.०८ अंकांवर बंद झाला. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांकही (NSE Nifty) ५३१.९५ अंकांनी घसरून १६,८४२.८० अंकांवर बंद झाला. बीएसई आणि एनएसई मध्ये गेल्या वर्षभरात झालेली सर्वात मोठी घसरून असून, गेल्या दोन दिवसांत गुंतवणूकदारांचे १२.४३ कोटी रुपये बुडाले.
ADVERTISEMENT
निर्देशांकांची घसरगुंडी उडण्याची तीन कारणं…
सोमवारी बीएसईचा कम्बाईन्ड मार्केट कॅप गुरूवारी २६७.८१ लाख कोटी रुपये होता. तो सोमवारी २५५.३८ लाख कोटी रुपयांवर आला. यापूर्वी २०२१ मध्ये बीएसई निर्देशांकांत १,९४० अंक, तर निफ्टी ५६८ अंकांनी घसरला होता. शेअर बाजारात झालेल्या घसरणीने आता त्याच्या कारणांचा उहापोह केला जात आहे.
हे वाचलं का?
१) रशिया-युक्रेन वाद
युक्रेन-रशियामधील वाढत्या तणावाचा परिणाम शेअर बाजारावर दिसून येत आहे. “रशिया-युक्रेनमधील संघर्ष वाढत असून, कच्च्या तेलाचे दर वाढण्याची तसंच वाढत्या महागाईमुळे यूएस फेडरेशनकडून व्याजदर वाढवणं अपेक्षा आहे. याचा परिणाम म्हणून काही काळासाठी नकारात्मक वातावरण आहे. मात्र, माझ्या मते युक्रेन संकटामुळे ही घसरण होत असून, तणाव निवळल्यानंतर पुन्हा शेअर मार्केटमध्ये तेजी दिसेल,” असं Hem Securities चे प्रमुख मोहित निगम यांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
२) ABG Shipyard Fraud:
ADVERTISEMENT
एबीजी शिपयार्डकडून झालेल्या बँक फसवणूक प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केला असून, या घटनेचाही शेअर बाजारावर परिणाम दिसून येत आहे. बँकांची फसवणूक केल्याच्या या प्रकरणामुळे खासगी क्षेत्र आणि सार्वजनिक बँकां या दोन्हींच्या शेअरवर परिणाम झाल्याचं दिसत आहे. निफ्टी बँक ४.१८ टक्क्यांनी घसरला.
३) परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीकडे कल :
परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढल्याचाही परिणाम शेअर मार्केटवर होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या ११ दिवसांत परदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी १४,९३५ कोटी रुपये काढून घेतले आहेत. सलग चौथ्या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री करण्यात आल्याचा नकारात्मक परिणाम दिसत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT