10 वर्ष एकत्र फिरले, पण हनीमूनला जाताच पत्नी हादरली; कारण...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Couple Honeymoon Romantic Story
Couple Honeymoon Romantic Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हनीमुनला गेल्यावर पत्नीला धक्काच बसला, कारण जाणून थक्कच व्हाल

point

पती-पत्नीत असं काय घडलं, ज्यामुळे हनीमून ट्रीप फेल गेली

point

कपलची रोमॅन्टिक स्टोरी वाचून चक्रावून जाल

लग्नानंतर नवऱ्यासोबत एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊन मनमोकळेपणानं वेळ घालवणं प्रत्येक तरुणीचं स्वप्न असतं. हनीमुनला प्रत्येक क्षण आनंदाने जगण्याची प्रत्येक तरुणीची इच्छा असते. कारण हनीमुन एक अशाप्रकारचा क्षण असतो, जो प्रत्येक कपलसाठी महत्त्वाचा ठरतो. पण एका तरुणीचं हनीमुनला अविस्मरणीय क्षण बनवण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहिलं. हनीमुनला अशाप्रकारचा झटका लागेल, असं त्या तरुणीलाही कधी वाटलं नाही.  नेमकं प्रकरण काय आहे? याबाबत जाणून घेऊयात.

हनीमुनला महिलेसोबत काय घडलं?

अनेक वर्ष सोबत राहिल्यानंतर ट्रेसी (30) आणि ब्रायनने (29) लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नाच्या आधीच ट्रेसी आणि ब्रायनला दोन मुलं आहेत. आय लव्ह ए ममाज बॉय नावाच्या एका टीव्ही शोवर ब्रायने म्हटलं, "माझी आई माझ्यासाठी खूप खास आहे". ब्रायनची आई जेनने स्वत:ही लग्न केलं नव्हतं. त्यामुळे ब्रायनला वाटायचं की, माझ्यासह आईलाही त्यांच्या लग्नाचा दिवस खास वाटला पाहिजे. शोमध्ये ट्रेसीने म्हटलं, मला जेनसोबत अनेक गोष्टी शेअर कराव्या लागतात. कारण ब्रायन त्यांना प्रत्येक गोष्टीत सांगायचा. ब्रायनने मला खूप जास्त प्राधान्य दिलं पाहिजे, यासाठी मी प्रयत्न करते.

हे ही वाचा >> Viral Video : 'सुनबाईचे 3000 रुपये आले...'; लाडक्या बहिणीचे पैसे मिळताच सासू-सुनबाई DJ वर थिरकल्या

ट्रेसीने सांगितलं की, आमच्या लग्नानंतर ब्रायनने मला न सांगताच आईलाही आमच्या हनीमून ट्रीपसाठी बोलावलं. ब्रायनने मला आमच्या या प्लॅनबाबत नंतर सांगितलं. हे ऐकताच ट्रेसीचा मूड खराब झाला. पण असं असतनाही ट्रेसी ब्रायनला काही म्हणाली नाही. त्यानंतर ते सर्व आपल्या दोन मुलांसोबत आणि आईसोबत हनीमुन ट्रीपला गेले. ट्रेसी आणि ब्रायनच्या या हनीमून ट्रीपवर जेन संपूर्ण वेळ मुलांची देखरेख करण्यात व्यग्र होती. त्यामुळे ट्रेसीलाही काही समस्या जाणवली नाही. जेव्हा ट्रेसी आणि ब्रायन त्यांचं हनीमून एन्जॉय करत होते, त्यावेळी जेनसुद्धा खूप एन्जॉय करत होती. परंतु, ट्रेसीचं आनंदाचा काही वेळाने शेवटच झाला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हनीमुनला ट्रेसी आणि ब्रायन हॉट टबमध्ये एक दुसऱ्यासोबत एन्जॉय करत होते. पण त्यावेळी असं काही घडलं की, ट्रेसीला विश्वासच बसला नाही. अचानक जेनही जॅकूजीमध्ये आली. ब्रायनने आईला त्याच्या मुलांच्या बद्दल विचारलं, तेव्हा जेनने म्हटलं की, तिने दोन्ही मुलांना बेबीसीटरवर सोडलं आहे. जेनने ब्रायनला म्हटलं, मला माहित झालं की हॉटेलमध्ये बेबीसिटिंग सर्व्हिसही उपलब्ध आहे. त्यामुळे मुलं तिथे सेफ आहेत. त्यानंतर ट्रेसीला खूप राग आला आणि ती तिथून निघून गेली. ट्रेसीनं म्हटलं, जेन खरंच सीरियस आहे? कारण ती जे काही करत आहे, ते खूप वाईट आहे.

हे ही वाचा >> Optical Illusion : वाटतं तितकं सोपं नाही! हुशार असाल तर शोधून दाखवा फोटोत लपलेली मांजर

ती आमच्या मुलांना कोणत्याही बेबीसीटरजवळ कसं काय सोडू शकते? ट्रेसीने म्हटलं, जर मला मुलांसाठी हॉटेलच्या बेबीसीटरचा उपयोगच करायचा होता, तर आम्ही जेनला आमच्यासोबत या ट्रीपला आणलंच नसतं. ट्रेसी आणि ब्रायनच्या रिलेशनशिपच्या स्टोरीबद्दल लोक वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. सासूने कपलसाठी थोडी प्रायव्हसी दिली पाहिजे, कारण दोघांमध्ये चांगलं नातं राहिल, असंही काहींनी म्हटलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT