Viral Video : 'सुनबाईचे 3000 रुपये आले...'; लाडक्या बहिणीचे पैसे मिळताच सासू-सुनबाई DJ वर थिरकल्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Ladki Bahin Yojana Women Dance Viral Video
Ladki Bahin Yojana Women Dance Viral Video
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लाडक्या बहिणीचे पैसे मिळताच सासू-सुनेनं केला भन्नाट डान्स

point

सासू-सुनेच्या डान्सचा व्हिडीओ पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या

point

महिलांच्या डान्सचा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही चक्रावून जाल

Ladki Bahin Yojana Womens Dance Video : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वत्र गाजावाजा होताना दिसत आहे. राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केल्यापासून सोशल मीडियावर भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत आहेत. एकीकडे विरोधी पक्षांकडून या योजनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे शिंदे सरकार या योजनेबाबत नवनवीन माहिती समोर आणत आहे.

परंतु, ज्या महिलांना या योजनेचे 3000 रुपये मिळाले आहेत, त्यांच्या आनंदाला तर पारावरच उरला नाहीय. घरातील सूनबाईला माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर सासुच्या आनंदही द्विगुणीत झाल्याचं एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे. योजनेचे 3000 रुपये मिळताच सासूनं सुनेला डीजेच्या तालावर नाचवलं आहे. सासू-सुनबाईचा भन्नाट डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

हे ही वाचा >> Optical Illusion : वाटतं तितकं सोपं नाही! हुशार असाल तर शोधून दाखवा फोटोत लपलेली मांजर

@naktifamily0803 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या महिलांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला जवळपास दोन हजार लाईक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. या व्हिडीओत पाहू शकता की, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्यानंतर या महिलांना डान्स करण्याचा मोहच आवरला नाही. डीजेच्या तालावर सासू-सुनबाईनं केलेल्या डान्सची सर्वत्र चर्चा होत आहे. कारण अशाप्रकारचा मजेशीर डान्सचा व्हिडीओ यापूर्वी पाहिला नसल्याचं नेटकरी सांगत आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

इथे पाहा सासू-सुनबाईच्या डान्सचा भन्नाट व्हिडीओ

या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल, अशी घोषणा सरकारकडून करण्यात आली होती. परंतु, आता अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आला असून महिलांना दिलासा देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, पैशांचं टेन्शनच घेऊ नका! सरकारने दिली आणखी एक संधी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. लाभार्थ्याचं वय २१ ते ६५ वर्षांच्या आत असलं पाहिजे. विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत आणि बेवारस महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराकडे बँक खातं असलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT