Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो, पैशांचं टेन्शनच घेऊ नका! सरकारने दिली आणखी एक संधी
Mazi Ladki Bahin Yojana: विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी खूशखबर
शिंदे सरकारने योजनेबाबत घेतला मोठा निर्णय
कोणत्या महिन्यापर्यंत लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरता येणार?
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा नारळ फोडला. गरजू महिलांना दरमहा 1500 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. या योजनेवरून विरोधकांनी राजकीय वर्तुळात अनेक प्रश्नही उपस्थित केले. दरम्यान, या योजनेच्या माध्यमातून सरकारने आतापर्यंत दीड कोटींहून अधिक महिलांच्या खात्यावर पहिल्या हफ्त्याचे पैसे जमा केले आहेत.
ADVERTISEMENT
विशेष म्हणजे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदतही वाढवली आहे. ज्या महिलांच्या खात्यावर अजूनही पैसै जमा झाले नाहीत, त्यांना टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण सरकारने नुकताच एक जीआर काढला आहे. त्यामुळे महिलांना अर्ज भरण्यासाठी पुन्हा एकदा संधी मिळणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला होता. त्यामध्ये लाडकी बहीण योजना सुरु करण्याचं जाहीर केलं होतं.
हे ही वाचा >> Daily Horoscope : आज 'या' राशीच्या लोकांना लॉटरीच लागणार! समस्याही होतील दूर, पण...
या योजनेसाठी अर्ज भरण्याची तारीख 31 ऑगस्ट 2024 असेल, अशी घोषणा करण्यात आली होती. परंतु, आता अर्ज भरण्याच्या तारखेत मुदतवाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला आहे. सरकारकडून नवीन जीआर काढण्यात आला असून महिलांना दिलासा देण्यात आला आहे. कारण लाडकी बहीण योजनेसाठी सप्टेंबर 2024 पर्यंत महिलांना अर्ज करता येणार आहे.
हे वाचलं का?
या महिलांना मिळेल योजनेचा लाभ
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे. लाभार्थ्याचं वय २१ ते ६५ वर्षांच्या आत असलं पाहिजे. विवाहित, अविवाहित, घटस्फोटीत आणि बेवारस महिलाही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराकडे बँक खातं असलं पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असू नये.
हे ही वाचा >> Pune Murder: भर रस्त्यात 5 गोळ्या झाडल्या, माजी नगरसेवकाच्या हत्येनंतर पवारांचा नेता संतापला!
या महिलांना मिळणार नाही योजनेचा लाभ
- ज्या महिलांच्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त आहे
- ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात.
- ज्या महिलांच्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी विभाग/उपक्रम/बोर्ड/भारत किंवा राज्य सरकारचा कर्मचारी असेल.
- ज्या महिलांना सरकारच्या अन्य विभागाच्या एखाद्या योजनेद्वारे 1500 किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांचा लाभ मिळत असेल.
- ज्या महिलांकडे ट्रॅक्टर वगळता अन्य चारचाकी गाड्या आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT