नाशिकमध्ये टोळक्याचा भरदिवसा युवकावर कोयत्याने हल्ला; नागरिकांत भीतीचे वातावरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमधील सिडको परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी कारवायांमध्ये वाढ झाली असून, त्याचा प्रत्यंतर पुन्हा एकदा रविवारी दुपारी बघायला मिळालं. एका युवकावर टोळक्याने भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तरुण गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर सिडको परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ADVERTISEMENT

रायगड चौक परिसरातील शिवनेरी उद्यान परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणावर पूर्व वैमनस्यातून टोळक्याकडून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जखमी तरुणाला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पुढील उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

धक्कादायक ! दुचाकी अडवत महिलेला कारमध्ये टाकलं, बलात्कार करत काढले अश्लील फोटो, नाशिक हादरलं

हे वाचलं का?

सिडकोतील रायगड चौकातील शिवनेरी उद्यान परिसरात वीस वर्षीय मोहन देवकर हा तरुण उद्यान परिसरातून जात होता. यावेळी समोरून आलेल्या 5 ते 6 जणांच्या टोळक्याने पुर्व वैमनस्यातून कुरापत काढून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

नाशिक : महिला सरपंचाने विष प्राशन करत संपवलं आयुष्य; तिघांना पोलिसांनी केलं अटक

ADVERTISEMENT

याच दरम्यान टोळक्यातील एका तरुणाने स्वतः जवळच्या कोयत्याने मोहनवर वार केले. या घटनेचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाले असून, पोलिसांकडून संबंधित टोळक्याचा शोध घेतला जात आहे. टोळक्यातील बहुतांश मुले अल्पवयीन असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT