अजित पवार माझ्याच विचारांना चालना देत आहेत, उदयनराजेंचा खोचक टोला
अजित पवार हे माझ्याच विचारांना चालना देत आहेत. त्यांनी जास्तीत जास्तवेळा सातारा दौरा करावा. आम्ही वेळोवेळी सूचना देऊ आणि त्यांनी त्या आचरणात आणाव्यात, असा खोचक सल्ला उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांना दिला आहे. अजित पवारांच्या साताऱ्या दौऱ्यावरून हा टोला लगावला आहे. जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्ह्यात अलिकडे अजित पवारांचे […]
ADVERTISEMENT

अजित पवार हे माझ्याच विचारांना चालना देत आहेत. त्यांनी जास्तीत जास्तवेळा सातारा दौरा करावा. आम्ही वेळोवेळी सूचना देऊ आणि त्यांनी त्या आचरणात आणाव्यात, असा खोचक सल्ला उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांना दिला आहे. अजित पवारांच्या साताऱ्या दौऱ्यावरून हा टोला लगावला आहे.
जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सातारा जिल्ह्यात अलिकडे अजित पवारांचे दौरे वाढले आहेत याविषयी विचारला असता उदयनराजेंनी अजित पवारांना सल्ला दिला आहे. वास्तविक हा विषय त्यांच्याशी निगडीत नाही. मात्र ते माझ्या मताशी असहमत आहेत.
नेमकं काय म्हणाले उदयनराजे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे साताऱ्यात दौरे वाढले असल्याचे या विचारलेल्या प्रश्नावर खासदार उदयनराजे यांनी चांगलीच आगपाखड केली.अजित पवार माझ्या मतांशी सहमत आहेत.. मी त्यांना जास्तीत जास्त दौरे येथे करा असे सांगितले आहे. माझ्या विचारांना चालना देण्याचं काम मंत्री या नात्याने अजित पवार करत आहेत.. सूचना आम्ही देत जाऊ त्या सूचना आचरणात आणण्याचे काम तुमच्या सारखे तज्ञ आणि अनुभवी लोकांनी केलं पाहिजे असं सांगत खा.उदयनराजे यांनी आगपाखड केली आहे.
‘सातारा जिल्ह्याला लाभलेली जी नैसर्गिक देणगी आहे, त्यात पर्यटनाच्या माध्यमातून एमटीडीसी किंवा इतरांबाबत आदित्य ठाकरे यांच्यासोबत बोलणं झालं आहे. नवरात्रीनंतर आम्ही भेटणार आहोत. सर्वाधिक धरणं असलेला हा जिल्हा आहे. व्याघ्र प्रकल्प आहे, महाबळेश्वर, पाचगणी आहे, त्यामुळे जास्तीत जास्त स्पोर्ट प्रकल्प राबवले जावे. सिनेमाचं शुटिंग इथं वाढावं, त्यामुळे इथल्या लोकांना रोजगार मिळेल’ अशी माहिती उदयनराजेंनी दिली.