नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण - Mumbai Tak
Mumbai Tak /बातम्या / नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण
बातम्या

नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूप्रकरणाला आता नवं वळण

नौदल अधिकारी सुरजकुमार दुबे यांच्या मृत्यूला आता नवं वळण मिळालंय. पोलिसांनी केलेल्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, सुरजकुमार दुबे यांच्याकडे 3 मोबाईल नंबर होते. ज्यातील केवळ 2 नंबरबाबत त्यांच्या घरच्यांना माहिती होती. 1 फेब्रुवारीला दुबेंचा चुलत भाऊ चंदन कुमार याच्याशी तिसऱ्या नंबरवरून संपर्क झाला होता. त्यानंतर हा तिसरा नंबर वापरत असलेला फोन बंद करण्यात आला.

पालघर पोलिसांनी नौदल अधिकारी सुरजकुमार दुबेंच्या बँक खात्यांचाही तपास केला. यामध्ये दुबेंनी भोपाळमधील आस्था आणि मुंबईतील एंजल या शेअर ब्रोकिंग कंपनीसोबतही याच नंबरवरून काही व्यवहार केल्याचं समोर आलंय. दुबेंचं सॅलरी अकाऊंट मुंबईतल्या कोलाब्यातील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये आहे. या खात्यावरून दुबेंनी 8 लाखांचं कर्ज काढलेलं. या खात्यात आता केवळ 302 रूपये उरलेत.

याशिवाय दुबेंचं एसबीआयमध्येच आणखी एक अकाउंट होतं. ज्यामध्ये 5 हजार रूपये होते, पण ते ही 1 फेब्रुवारीला चेन्नईतून काढण्यात आलेले. या दोन्ही अकाऊंटवरून अनेक कर्ज काढण्यात आल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

सुरजकुमार यांनी आपल्या नौदलातील एका सहकाऱ्याकडूनही 6 लाख घेतले होते, ज्याची परतफेड करण्याबाबत तो सहकारी गेल्या अनेक दिवसांपासून सुरजकुमार यांना सांगत होता.

15 जानेवारीला दुबे यांचा साखरपुडा झाला. त्यावेळी सुरजकुमार यांच्या सासरच्यांनी त्यांना 9 लाख रूपये वेगवेगळ्या माध्यमातून दिलेले.

या सगळ्यांचे धागेदोरे पकडत आता पालघर पोलिस याप्रकरणी तपास करत आहे. एकूण 10 टीम तयार करण्यात आया असून चेन्नईलाही टीम गेलेली आहे.

चेन्नईला ट्रेनिंगला गेलेल्या सुरजकुमार दुबे यांचं अपहरण करून त्यांना पालघरमध्ये जिवंत जाळण्यात आलेलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालेला.

भारतीय नौदल अधिकारी सुरजकुमार मिथिलेश दुबे यांना पालघरमध्ये जिवंत जाळून मारण्यात आलंय. 25 वर्षीय सुरजकुमार हे मूळचे झारखंडचे….ट्रेनिंगनिमित्त ते तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये गेलेले.

30 जानेवारीला जेव्हा ते तामिळनाडूहून निघत होते, तेव्हा चेन्नई विमानतळावर तिघांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडचे पैसे आणि मोबाईल लुटले, शिवाय 10 लाखांची मागणीही केली. यानंतर सुरजकुमार यांना अज्ञात स्थळी 3 दिवसांसाठी डांबून ठेवलं. सुरजकुमार यांच्याकडून 10 लाख मिळणार नाही, असं कळताच 5 फेब्रुवारीला अज्ञातांनी सुरजकुमार यांना पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावात आणलं.

पालघरमध्ये आणल्यानंतर शुक्रवारी घोलवड जवळील जंगलात सुरजकुमार यांचे हात-पाय बांधण्यात आले, आणि त्यांच्यावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत जाळलं. यात सुरजकुमार 90 टक्के भाजले. त्यांच्या किंकाळ्या ऐकून गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली. घोलवड पोलिसांनी डहाणूच्या जिल्हा रुग्णालयात सुरजकुमार यांना दाखल केलं. पण त्यांची तब्येत इतकी नाजूक होती, की डॉक्टरांनी त्यांना मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. मात्र उपचारादरम्यान सुरजकुमार यांचा मृत्यू झाला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

8 − 2 =

गावातील मुलींचा रॅम्पवॉक पाहून सर्वच अवाक्… ऐश्वर्या रायच्या ‘या’ बॅगच्या किंमतीत तुम्ही सगळी ‘दुबई’ फिरून याल! दररोज 500 प्रपोजल, तरीही सिंगल, मॉडेल म्हणते, ‘मुले जवळ यायला घाबरतात’ अजब प्रेम कहाणी.. पतीला पाहताच पत्नीचा मृत्यू, असं घडलं तरी काय? रूममध्ये बोलावून केली अशी मागणी की, Swara Bhaskar हादरलीच! Ashish Vidyarthi : 60 व्या वर्षी लग्न अन् बायकोला घरी ठेवून गेला हनिमूनला Lalbaugcha Raja 2023 पाद्यपूजन सोहळा, पाहिलेत का? ‘हे’ खास Photo WTC अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूने शतक झळकावलं तर, भारताचा विजय निश्चित! अभिनेता Prabhas तिरुपतीमध्ये घेणार सात फेरे पण… शरीराचे वजन मोजण्यापूर्वी योग्य वेळ आणि ‘या’ गोष्टी लक्षात घ्या! Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर लग्न करणार? म्हणाला… मुंबई-दुबईत घर, लक्झरी कार कलेक्शन; ‘Aishwarya Rai’ची पतीपेक्षा चौपट संपत्ती! IPL चा ‘हा’ स्टार खेळाडू मंदिरात लुंगी नेसून खेळला क्रिकेट, Video Viral ‘गणपती बाप्पा मोरया!’, Sara-Vicky ने घेतलं बाप्पाचं दर्शन; पोहोचले सिद्धीविनायक मंदिरात! ऋतुराज गायकवाडनंतर ‘हा’ IPL स्टार लग्नबंधनात अडकणार कॉन्सर्टमध्येच थांबवला…प्रसिद्ध गायिकेसोबत काय घडलं? प्रसिद्ध अभिनेत्यांची गर्लफ्रेंड लग्नाशिवाय दुसऱ्यांदा होणार आई ! वादळांना नावं कशी दिली जातात? समजून घ्या… अभिनेत्री Prajakta Mali चा बोल्ड लुक! ट्रोलर्स म्हणाले, ‘नको ग बाई..’ sonalee Kulkarni : अप्सरेचं पतीसोबत रोमँटिक फोटोशूट!