मुक्ता टिळकांनंतर रुपाली पाटील कसब्यातून इच्छुक : पोटनिवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु

मुंबई तक

ADVERTISEMENT

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतचं निधन झालं. नियमानुसार सहा महिन्यात इथे पोट निवडणूक घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे आतापासूनच या पोटनिवडणुसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या कसबातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी स्वतः मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे. रुपाली पाटील म्हणाल्या, पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून […]

social share
google news

पुणे : भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं नुकतचं निधन झालं. नियमानुसार सहा महिन्यात इथे पोट निवडणूक घेणं बंधनकारक आहे. त्यामुळे आतापासूनच या पोटनिवडणुसाठी मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील या कसबातून पोटनिवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं त्यांनी स्वतः मुंबई तकशी बोलताना सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

रुपाली पाटील म्हणाल्या, पक्षाने आदेश दिला तर मी कसबा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवणार. मुक्ताताई टिळक यांच्यानंतर त्यांचा घरातून राजकारणात येण्यासाठी आणि पोटनिवडणूक लढवण्यासाठी कोणी नाही. त्यांचे पती राजकारणात सक्रिय नाहीत, मुलगाही लहान असून त्याचे नुकतेच लग्न झाले आहे.

मुक्ताताई टिळक आमदार झाल्यापासून आजारी होत्या, त्यामुळे कसबा मतदारसंघामध्ये कामं झाली नाहीत. तसंच २०१९ मध्ये मुक्ताताई आहेत म्हणून मनसेने माझं तिकीट कापलं होतं. त्यावेळी मी तडजोड केली, असा गौप्यस्फोट करत या पोटनिवडणुकीत तिकिट दिल्यास जनतेचा कौल मी स्वीकारेल, असंही पाटील यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

काय म्हणाल्या रुपाली पाटील?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT