Shraddha Murder Case : “श्रद्धाचं फ्रीजमध्ये ठेवलेलं शीर दररोज पाहायचो” ऐकून पोलिसही हादरले

मुंबई तक

ADVERTISEMENT

आपल्या 26 वर्षांच्या लिव्ह-इन पार्टनरची (श्रद्धा वालकर) हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबने तिचं शीर फ्रिजमध्ये जपून ठेवलं होतं. इतकंच नाही, तर आफताब दररोज ते शीर पहायचा… ही धक्कादायक बाब आफताबने पोलिसांना दिलेल्या जबाबातून समोर आलीय. 18 मेला 26 वर्षांच्या श्रद्धा वालकर या आपल्या प्रेयसीचा खून करुन आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. […]

social share
google news

18 मेला 26 वर्षांच्या श्रद्धा वालकर या आपल्या प्रेयसीचा खून करुन आफताबने तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले. हे तुकडे फ्रिजमध्ये ठेवून तो ते दररोज रात्रीच्या वेळी जंगलात नेऊन टाकायचा. पण प्रत्येकवेळी तिच्या शरीराचा 1 किंवा 2 तुकडेच तो जंगलात नेऊन टाकायचा, असं त्याने पोलिसांना सागिंतलं.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

श्रद्धाच्या शरीराच्या तुकड्यांमध्ये सर्वात शेवटी श्रद्धाचं शीर त्याने जंगलात नेऊन टाकलं. तोवर श्रद्धा आणि त्याच्या नात्याची आठवण म्हणून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलेलं श्रद्धाचं शीर तो दररोज पाहायचा… ही हादरवून टाकणारी माहिती आफताबनेच पोलिसांना दिलीये.

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामधील आजवरच्या तपासात पोलिसांना काही हाडं सापडली आहेत. या हाडांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. पण पोलीस श्रद्धाचं शीर शोधताहेत. आफताबने श्रद्धाचं शिर कुठे टाकलंय याची माहिती घेण्याचा ते प्रयत्न करताहेत. श्रद्धाचं शीर सापडल्यानंतर पोलिसांना या तपासात मोठी मदत होणार आहे.

हे वाचलं का?

‘मी तिला मारलं’ अशा शब्दात पोलिसांकडे आपल्या गुन्ह्याची कबुली देणारा आफताब पूनावाला पोलिसांना देत असलेली माहिती सारखी बदलतोय. तसंच ही माहिती आठवत नाही नसल्याचंही सांगतोय. यामुळे श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांसमोर अडथळे निर्माण होताहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT