उध्दव ठाकरेंनी अमित शहांवर केली टीका, CM एकनाथ शिंदेंचं रोखठोक उत्तर
उध्दव ठाकरेंनी नागपूरात अमित शहांवर टीका केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT
Uddhav Thackeray vs Eknath Shinde: नागपुरमध्ये उध्दव ठाकरेंनी गृहमंत्री अमित शहांवर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण तापलं आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपुरातील रामटेक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण केले आणि यावेळी शहांवर टीका केली. काही दिवसांपूर्वी बाजारबुणगे इथे येऊन गेले, असं म्हणत त्यांनी शहांवर कडाडून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून ठाकरेंची पात्रता काढली आहे. "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्यावर बोलण्याची आपली पात्रता आहे का, हे जरा काही जणांनी आरशात बघावं. बाळासाहेबांनी राजकारण व हिंदुत्वाची गल्लत केली, असे बोलणाऱ्यांना त्यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार तरी उरला आहे का?" असं म्हणत शिंदे ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. आता या ट्वीटवरुन राजकारणात पुन्हा वादाला सुरुवात होईल का, हे पाहणं महत्वाचं राहील.