आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर बदलापूर स्टेशनवर काय घडलं?
अक्षय शिंदे एन्काऊंटरनंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. मात्र आता शिवसेनेनें सेलिब्रेशन केलं आहे.

ADVERTISEMENT
Badlapur Rape Case Latest Update : बदलापूर अत्याचाराच्या घटनेनंतर अक्षय शिंदेला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी बदलापुरातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. प्रवाशांनी रेल्वेरुळावर उतरून रेल्वे रोखून धरल्या होत्या. त्यानंतर आज पुन्हा एकदा बदलापूर स्टेशनमध्ये गर्दी झालीय, पण यावेळी झालेली गर्दी संतापलेली नाहीये, तर अक्षयच्या मृत्यूनंतर आनंद व्यक्त करणारी आहे. बाहेरून लोकं आणून बदलापूरमध्ये आंदोलन केलं गेलं, असा आरोप शिवसेना नेते वामन म्हात्रेंनी केला होता. आता तेच वामन म्हात्रे त्याच बदलापूर स्टेशनमध्ये पेढे वाटताहेत. सामान्य बदलापूरकर आंदोलन करत असताना जी शिंदेंची शिवसेना निषेध आंदोलनात कुठेच नव्हती आता तीच शिवसेना एन्काऊंटर झाल्यानंतर सेलिब्रेशन करायला सर्वात आधी बदलापूर स्टेशनमध्ये पोहचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय.