पवारांनी तुमच्या डोक्यात मुख्यमंत्रिपदाचा बल्ब पेटवला अन् सगळंच…: CM शिंदे

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

eknath shinde criticize uddhav thackeray : तुमच्या डोक्यामध्ये त्यांनी (शरद पवार) मुख्यमंत्री पदाचा बल्ब पेटवला, आणि सगळचं बिघडलं, वाईट होते ते सगळे चांगले झाले आणि सगळ विसरून गेलात, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) टीका केली. तसेच हा एकनाथ शिंदे वफादार आहे, गद्दार नाही खुद्दार आहे, त्याने कधी बेईमानी केली नाही. ही बेईमानी माझ्या रक्तात नाही, हा सत्तेसाठी मिंधा झाला नाही, होणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी खेडच्या सभेत व्यक्त केला. (cm shinde criticizes uddhav thackeray for ‘betrayal of balasaheb’s idea for the post of CM‘)

5 मार्च रोजी उद्धव ठाकरेंनी खेडमधील सभेमधून शिंदे गटावर आणि भाजपावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता त्याच गोळीबार मैदानातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर दिले आहे. याच मैदानात फुसका बार येऊन गेला, आपटी बार येऊन गेला,अशा शब्दात शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या सभेची खिल्ली उडवली. तसेच गेले सहा महिने थयथयाट, आदळआपट सुरू आहे. सभेची जागा बदलतेय, पण तेच टोमणे तेच भाषण सूरू आहे, खोके, गद्दार हेच शब्द आहेत, अशी टीका देखील शिंदे यांनी केली.

‘बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केलीत’, रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी

बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी, गद्दारी आणि विश्वासघात केला, फक्त मुख्यमत्री पदाच्या खुर्चीसाठी अशी घणाघाती टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.सत्तेसाठी तडजोड करताय म्हणून आम्हाला हा निर्णय़ घ्यावा लागला,असे देखील शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले. अशोच चव्हाण मुख्यमंत्री असताना तुम्हीच म्हणाला होतात त्यांनीच शेण खाल्लय, मग आता तु्म्ही त्यांच्या पक्तीत बसून तुम्ही काय खाताय? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.

गहान ठेवलेला धनु्ष्यबाण आम्ही सोडवला

कोण कोणाला डोळा मारत होते, हे तुम्ही पाहिलंत. अजित दादांनीच मारला. ज्या लोकांच्या गळ्यात गळे घालतायत तेच उद्या तुमचा कधी गळा दाबतील, हे तुम्हाला कळणार नाही. हा त्यांचा पुर्व इतिहास तपासून पाहा, असा सल्ला देखील शिंदे यांनी ठाकरे यांना दिला. तसेच सत्तेसाठी कॉग्रेस आणि राष्ट्रवादीकडे पक्ष दावणीला बांधलात, धनुष्यबाण गहाण ठेवला, तो आम्ही सोडवण्याचे काम केले, आणि शिवसेना वाचवण्याचा काम केले असे देखील शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत.

ADVERTISEMENT

‘पवारांच्या तुकड्यावर जगणाऱ्यांनी…’, CM शिंदेंच्या सभेपूर्वीच रामदास कदमांचा ठाकरेंवर वार

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे तुमच्यावर किती केसेस आहेत?

शेकडो केसेस अंगावर घेतल्यांना तुम्ही गद्दार म्हणता,तुमच्या अंगावर किती केसेस आहेत. या एकनाथ शिंदेवर 109 केसेस आहेत. तुम्हाला बोलायचा अधिकार काय आहे, असा सवाल शिंदेंनी ठाकरेंना केला. रामदास कदमांनी कोकणात शिवसेना वाढवली. गजानन किर्तीकरांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम केले. हा त्यांचा गुन्हा आहे? आज त्यांना संपवायला तुम्ही निघालात? दोन नगरपालिका राष्ट्रवादीच्या खिशात घातल्या. याचा साक्षीदार मी आहे, असे देखील शिंदे यांनी म्हटले.

तुम्ही कार्यकर्त्यांनाच संपवायला निघालात…

कार्यकर्त्यांना मोठे करणारे बाळासाहेब होते, तु्म्ही तर कार्यकर्त्यांनाच संपवायला निघालात. कार्यकर्ता ज्यावेळेस मोठा होतो.त्यावेळेस पक्ष मोठा होतो. एखादा मोठा झाला की यांची पोटदूखी होते, भिती वाटते, यांचे खच्चीकरण होते.जसे रामदास कदम, राज ठाकरे, नारायण राणे बाबत झाले होते. अशी टीका शिंदे यांनी केली. रामदास कदम, गुलाबराव पाटील यांच्या भाषणाला टाळ्या पडतात म्हणून तुम्ही त्यांची भाषण बंद करतात.कशी मोठी होईल संघटना? कसा पक्ष वाढणार? असा सवाल देखील शिंदेंनी केला.

राहुल गांधींच्या दिल्लीतील घरी पोहोचले पोलीस; काय आहे प्रकरण?

आज बाळासाहेब आणि शिवसेनेवरच प्रेम तुम्ही पुन्हा एकदा दाखवून दिले आहेत. बाळासाहेबांनी तुम्हाला जसं प्रेम दिंल तसेच प्रेम देण्याची जबाबदारी एकनाथ शिंदेंची आहे,तुम्हाला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. कोकणाकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी भाषणाच्या शेवटी कोकणवासीयांना दिले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT