Maharashtra Budget 2023: शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार; देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Devendra fadnavis Maharashtra Budget Speech : मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील युती सरकारचा पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विधानसभेत केला. यावेळी अर्थसंकल्पात फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12 हजार रुपयांचा सन्माननिधी मिळणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअतंर्गत हा निधी मिळणार आहे. (Finance Minister Devendra Fadnavis presented the first budget)

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना :

– प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर

– प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

– केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार

– 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ

ADVERTISEMENT

– 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार

ADVERTISEMENT

अमृतकाळातील पहिला अर्थसंकल्प

फडणवीस यांनी यावेळी ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित हा अर्थसंकल्प असल्याची घोषणा केली.

1) शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी

2) महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास

3) भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास

4) रोजगारनिर्मिती : सक्षम, कुशल, रोजगारक्षम युवा

5) पर्यावरणपूरक विकास

यातील पहिल्या अमृताअंतर्गत म्हणजे शाश्वत शेती-समृद्ध विकास याअंतर्गत फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजनांची घोषणा केली.

आणखी कोणत्या योजना आहेत?

– महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना कर्जमाफी योजनांचे लाभ

– 2017 च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतील उर्वरित पात्र शेतकर्‍यांना योजनेचे लाभ देणार

– महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ या सरकारने दिले.

– 12.84 लाख पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात 4683 कोटी रुपये थेट जमा.

Maharashtra Budget 2023 Live: शेतकऱ्यांसाठी योजना, फडणवीसांच्या मोठ्या घोषणा

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा

– आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून

– आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता

– शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा

– 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

महाराष्ट्रातील शेतकर्‍यांसाठी महाकृषिविकास अभियान

– राज्यातील शेतकर्‍यांच्या उत्पन्नवाढीसाठी महाकृषिविकास अभियान

– पीक, फळपीक घटकाच्या उत्पादनापासून ते मूल्यवर्धनापर्यंत

– तालुका, जिल्हानिहाय शेतकरी गट, समूहांसाठी योजना

– एकात्मिक पीक आधारित प्रकल्प आराखडा तयार करणार

– 5 वर्षांत 3000 कोटी रुपये उपलब्ध करून देणार

‘मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार

– मागेल त्याला शेततळे योजनेचा आता व्यापक विस्तार

– आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण

– मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर

– या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार

Maharashtra Budget: ‘मविआ’चा प्लान ठरला! बजेट आधीच घेतला मोठा निर्णय

काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, काजू फळ विकास योजना!

– 200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड

– काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव

– उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र

– कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना

– 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद

गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

– आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत

– गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून

– आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

– ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार

– अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत ला

नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन

– नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार

– 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार

– 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार

– डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ

– 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्र

– सोलापुरात स्थापन करणार

– आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’

– 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद

– सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार

नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र

– नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार

– अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश

– या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार

– नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र /20 कोटी रुपये तरतूद

शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!

– विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत

– अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात

– प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

    follow whatsapp

    ADVERTISEMENT