बुलढाणा : ठाकरे-शिंदे गटात तुफान राडा; आमदार पुत्रांकडून मारहाण झाल्याचा आरोप

शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्या पुत्राकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा
Buldhana
Buldhana Mumbai Tak

बुलढाणा : शिवसेनेतील ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट हा वाद आता मुद्द्यांवरून गुद्यांवर पोहोचला आहे का? असा सवाल सध्या बुलढाण्यात विचारला जात आहे. बुलढाण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत ठाकरे गटाच्या कार्यक्रमावर काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली, असा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, हा हल्ला शिंदे गटाकडून करण्यात आला असल्याचा आरोप संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केला.

नेमके काय झाले बुलढाण्यात?

बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात आज ठाकरे गटाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता. यावेळी काही तरुणांनी अचानक हल्ला केला. यात शिवसेना संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले यांनाही मारहाण करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावेळी मोठा पोलिस फौजफाटा उपस्थित होता.

Buldhana
ठाकरे सरकारने पाठवलेली 12 आमदारांची नावं CM शिंदेंकडून मागे; अजित पवार म्हणतात...

दरम्यान संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी हा हल्ला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचे कार्यकर्ते आणि गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांच्याकडून करण्यात आला असल्याचा आरोप केला आहे.

नरेंद्र खेडेकर म्हणाले की, हल्ला करणाऱ्यात आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड तसेच त्यांचे सहकारी आघाडीवर होते. यासंदर्भात अनेक व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, ज्यात कुणाल गायकवाड स्पष्ट दिसत आहेत. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार चालला. पोलिस बघ्याची भूमिका घेऊन होते, असाही आरोप खेडकर यांनी केला आहे.

Buldhana
'शिल्लक राहिलेली काँग्रेस आम्ही वाटून घेऊ'; एकनाथ शिंदेंच्या समोर नारायण राणे काय म्हणाले?

कार्यक्रामात तुफान राडा :

दरम्यान हल्ला होतेवेळच्या व्हिडिंओमध्ये खुर्च्यांची फेकाफेक करण्यात आली असल्याचे दिसत आहे. तसेच काही पदाधिकाऱ्यांना अक्षरशः लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असल्याचे दिसत आहे. संबंधित घटनेनंतर पोलिसांची अतिरिक्त कुमक दाखल झाली. यावेळी पोलिस दलाच्या वतीने जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in