‘…मग भुजबळांचा राजीनामा कसा मंजूर होईल?’, फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी व्यक्त केली शंका
छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले. त्यांच्या या विधानावर खासदार संजय राऊत यांनी वेगळीच शंका व्यक्त केलीये.
ADVERTISEMENT

Sanjay Raut Chhagan Bhujbal : 17 नोव्हेंबरला ओबीसींची सभा घेण्यापू्र्वीच मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, असे सांगत छगन भुजबळ यांनी राजकीय बॉम्ब टाकला. पण, यावर खासदार संजय राऊत यांनी वेगळी शंका उपस्थित केली. देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत राऊतांनी या प्रकरणावर भाष्य केलं.
माध्यमांशी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावर भूमिका मांडली. राऊतांनी काही सवाल केले असून, भुजबळांचा राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार मुख्यमंत्री शिंदेंना आहेत का? असंही त्यांनी म्हटलं आहे.
“राजीनामा देण्याचे नाटक”
’16 नोव्हेंबरलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला’, या छगन भुजबळ यांच्या विधानावर खासदार संजय राऊत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. जर राजीनामा दिला आहे. तुम्हाला मंत्रिमंडळात काम करायचं नाहीये, तुम्हाला ओबीसींसाठी काम करायचं आहे आणि तुमचा राजीनामा मंजूर केला जात नाही, ही दोघांची मिलीभगत आहे. मी राजीनामा देण्याचे नाटक करतो, तुम्ही मंजूर करू नका. किंवा तुम्ही राजीनामा द्या आम्ही मंजूर करणार नाही.”
हेही वाचा >> भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांना कुठे कुठे मारल्या गोळ्या? Photo
“छगन भुजबळ आजकाल जे बोलत आहेत, हल्ली त्यांच्या तोंडातून जे निघत आहे; लोक म्हणतात की फडणवीस त्यांच्या मुखातून बोलत आहेत. मग त्यांचा राजीनामा कसा मंजूर होईल? पण, आमची ही भूमिका कायम राहिली आहे की, मंत्रिमंडळातील कुणी मुख्यमंत्री किंवा सरकार विरोधात भूमिका घेत असेल, तर त्याला मंत्रिमंडळ राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी त्याला मंत्रिमंडळातून बाहेर करायला करावं”, अशी मागणी राऊत यांनी केली.










