Lok Sabha : ‘इंडिया’ची महत्त्वाची बैठक! मोदी सरकारविरोधात आणणार अविश्वास प्रस्ताव
मणिपूर हिंसाचारावरून संसदेत सुरू असलेल्या गदारोळात, नव्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या आघाडीचे सदस्य मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत.
ADVERTISEMENT

INDIA vs NDA : मणिपूर हिंसाचारावरून संसदेत सुरू असलेल्या गदारोळात, नव्याने स्थापन झालेल्या विरोधकांच्या आघाडीचे सदस्य मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहेत. अविश्वास प्रस्ताव सरकारला मणिपूरमधील परिस्थितीवर दीर्घ चर्चा करण्यास भाग पाडेल, या चर्चेदरम्यान पंतप्रधानांना जबाबदार धरले जाईल, असा विश्वास विरोधी पक्षांच्या नेत्यांना आहे. (Amidst the ongoing uproar in Parliament over Manipur, members of the newly formed opposition alliance INDIA are preparing to bring a no-confidence motion against the Modi government.)
या मुद्यावर विरोधी पक्षांमध्ये एकमत झाले असून, किमान 50 सदस्यांच्या सह्या घेण्यासाठी स्वाक्षरी मोहीम सुरू आहे. विरोधी पक्ष आज लोकसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास ठराव आणणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिली.
‘लोकांचा सरकारवरील विश्वास उडत चालला आहे’
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, ‘आम्ही सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणत आहोत. कारण लोकांचा सरकारवरील विश्वासाला तडा जात आहे. पंतप्रधान मोदींनी मणिपूरवर बोलावे अशी आमची इच्छा होती, पण पंतप्रधान ऐकत नाहीत. ते सभागृहाबाहेर काहीतरी बोलतात आणि इथे ते नाकारतात. त्यांचे लक्ष वेधण्याचा आम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केला. पण सर्व अपयशी ठरले, त्यामुळे अविश्वास प्रस्ताव आणणे आम्हाला योग्य वाटते.’
वाचा >> Rajyasabha: ‘त्या’ खासदारावरुन राडा… जाणून घ्या खासदार कधी आणि कसे होतात निलंबित?
‘नेहमी जिंकण्यासाठी आणले जात नाही…’
काँग्रेस नेते चौधरी म्हणाले की, ‘अविश्वास प्रस्ताव नेहमी विजयासाठी आणला जात नाही. हुकूमशाही सरकार कसे चालवले जाते आणि विरोधकांचा अनादर कसा केला जातो, हे देशाला कळायला हवे.’ ते म्हणाले की, ‘जिंकणे किंवा हरणे हा विषय नाही. अशा परिस्थितीतही अविश्वास प्रस्ताव का आणावा लागला, हा प्रश्न आहे.’










