Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित

Rajya sabha election update : राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू
Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित

राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपचे आमदार विधान भवनात दाखल झाले असून, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असून, सहाव्या जागेवर कोण निवडून येणार, याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

राजस्थान : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित

महाराष्ट्रासह चार राज्यात राज्यसभेची निवडणूक झाली. राजस्थानातील निकाल लागले असून, काँग्रेसने तिन्ही जागांवर विजय मिळवला. मात्र, या निवडणुकीत भाजपने आमदार शोभाराणी खुशवाह यांना निलंबित केल्याची माहिती आहे. पीटीआय वृत्तसंस्थेनं भाजपतील सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिलीये. कुशवाह यांनी क्रॉस व्होटिंग केल्याप्रकरणात ही कारवाई करण्यात आलीये.

ई़डीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झालाय; संजय राऊत भडकले

भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. भाजपच्या तक्रारीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत भाजपवर टीकास्त्र डागलं आहे.

"राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!," अशी टीका संजय राऊतांनी केलीये.

शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार

भाजपपाठोपाठ केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. शिवसेनेनं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यांची मतं बाद ठरवण्याची मागणी शिवसेनेनं आयोगाकडे केली आहे.

राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि आमदार सुहास कांदे यांच्या मतांवर आक्षेप घेत भाजपने थेट दिल्लीत धाव घेतली आहे.

भाजपने तिघांची मते बाद करण्यासंदर्भात थेट केंद्रीय निवडणूक आयोगाचे दरवाजे ठोठावले आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांना भाजपने पत्र दिलं असून, आता त्यावर निकाल झाल्यानंतर मतमोजणी सुरू होईल. त्यामुळे राज्यसभेचे निकाल येण्यास मध्यरात्रही होऊ शकते.

सहाव्या जागेवर कोण मारणार बाजी?

मतमोजणीला पाच वाजेपासून सुरूवात होणार होती, मात्र भाजपकडून मतदानाबद्दल आक्षेप घेण्यात आले आहेत. त्या आक्षेपांवर निर्णय झाला नाही. त्यामुळे मतमोजणी सुरू होण्यास विलंब होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे निकाल येण्यास उशिर होणार आहे.

भाजपने गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांच्या मतांबद्दल आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे या आक्षेपांवर निर्णय झाल्यानंतर मतमोजणीला सुरूवात होईल.

राज्यसभेसाठी मतदान पूर्ण! आता प्रतिक्षा निकालाची

राज्यसभा निवडणुकीसाठीची मतदान पार पडलं आहे. एकूण २८५ आमदारांनी मतदान केलं आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदान करता आलं नाही. दरम्यान, मतदान पूर्ण झाल्यानंतर आता निकालाकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. महाविकास आघाडीकडून चारही उमेदवार विजयी होण्याचा दावा केला आहे. दुसरीकडे भाजपनंही तिन्ही उमेदवार विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

शिवसेनेच्या संजय पवारांना राष्ट्रवादीसह कुणी-कुणी केलं मतदान ?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांना शिवसेनेची १४ मते मिळाली आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसची ९, काँग्रेसची २, समाजवादी पार्टीची २, बच्चू कडू यांच्या प्रहारची २, अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, चंद्रकांत पाटील, राजेंद्र यड्रावरकर, गीता जैन, नरेंद्र भोंडेकर, मंजुळा गावित, विनोद अग्रवाल, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल यांनी मतदान केल्याची माहिती आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारची आकडेवारी.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारची आकडेवारी.

राज्यसभा निवडणुकीसाठी दुपारी २ वाजेपर्यंत २८२ आमदारांनी मतदान केलं. सध्या तीन आमदारांचं मतदान बाकी आहे.

'बविआ'ची मतं महाविकास आघाडीला?

राज्यसभा निवडणुकीत बेरजेच्या राजकारणात बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे. हितेंद्र ठाकूर यांनी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे ते कुणाला मतदान करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. दरम्यान आज मतदानासाठी आल्यानंतर विधानभवन परिसरात राष्ट्रवादीचे उमेदवार प्रफुल्ल पटेल यांनी हितेंद्र ठाकूर यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे बविआची मते आघाडीला मिळणार का? हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

"संजय जाणार हे नक्की, कोणता संजय जाणार हे मी सांगणार नाही"

"100 टक्के विजय आमचा होणार आहे. 100 टक्के आत्मविश्वास आहे. धाकधूक नाही. कारण धाक फक्त फडणवीसांचा आहे आणि धूक महाविकास आघाडीची आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी बऱ्याच लोकांना विचारलं तर ते म्हणे महाभारतात जसा अश्वत्थामा गेला तसा या निवडणुकीत कोणीतरी संजय जाणारे एवढं नक्की आहे. अश्वत्थामा कोणता गेलेला ते धर्मराजाने सांगितलं नव्हतं. त्यामुळे कोणता संजय जाणारे हे मी सांगणार नाही," असं विधान अनिल भोंडे यांनी केलं आहे.

राज्यसभा निवडणूक : २३८ आमदारांनी बजावला मतदानाचा हक्क

राज्यसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान सुरू आहे. आतापर्यंत एकूण आमदारांपैकी २३८ आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. आतापर्यंतच्या मतदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा आमदारांनी शिवसेनेचे दुसरे उमेदवार संजय पवार यांनी पहिल्या पसंतीचं मत दिलं आहे.

राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमख यांची मतदान करण्यास परवानगी देण्याची विनंती न्यायालयाने फेटाळून लावली.

यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, "महाविकास आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार. भाजपने काटे पेरले आहे. बाभळीच्या झाडाला आंबे कसे येतील? भाजपची उलटी गिनती सुरू झालीये. एमआयएमचे आमदार आम्हाला मतदान करू इच्छित आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो. ईडी पूर्णपणे भाजपच्या ताब्यात आहे. ईडी न्यायालयात सांगते की त्यांना मतदानाचा अधिकार नाही. यातूनच दिसत की, ईडीवर भाजपचा किती दबाब आहे," असं काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

"ज्यांनी हिंदू बांधवांचा, हिंदू धर्माचा घोर विरोध केला तो एमआयएम पक्ष आता शिवसेनेला मतदान करणार, हेच आहे का शिवसेनेचं हिंदूत्व? जो हिंदूंना शिव्या घालणार, त्यांची मतं शिवसेना घेणार आणि वर छातीठोकपणे आमचं हिंदुत्व श्रेष्ठ असल्याचं म्हणणार. हे कसलं हिंदुत्व आहे? आमचा तिसराही उमेदवार जिंकून येईल हे निश्चित. परंपरा खंडित करायचं काय यांनी केलंय, हिंदूंच्या विरोधात असणाऱ्यांना यांनी बरोबर घेतलंय हे दुर्दैवी आहे," भाजप आमदार राम कदम म्हणाले.

आज विधानभवन, मुंबई येथे सकाळी 11.37 वाजेपर्यंत 180 आमदारांनी मतदान केले आहे.

"सर्वांचा आशिर्वाद माझ्या मागे आहे. विजय माझाच होणार. माझा अर्ज भरला, उद्धव ठाकरेंनी माझ्या नावाची घोषणा केली तेव्हाच मी विजयी झालो. माझा अर्ज भरला गेला, तेव्हा माझ्या नेत्याने माझी काळजी घेतली. शरद पवार, सोनिया गांधी सर्वपक्षियांशी बोलून सर्व नियोजन झालेलं आहे," असं शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी म्हटलं आहे.

"आमच्यात पूर्ण आत्मविश्वास आहे. कोणत्याही प्रकारची शंका नाही. आकड्यांची जुळवा जुळव झालेली आहे. पण त्यांच्यामध्ये काय चाललंय आपण कालपासून बघतच आहात. एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं असलं, तरी आमचा विजय निश्चित आहे. एमआयएमने त्यांना पाठिंबा दिला तरी काही फरक पडणार नाही. आमचं नियोजन झालंय. आमचा विजय होणार. गुलाल आमचाच उधळला जाणार," असा विश्वास प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांपैकी १० आमदारांनी शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना प्रथम पसंतीचं मत दिलं आहे.

आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४५ आमदारांनी बजावला मतदानाचा अधिकार, तर भाजपच्या ५० आमदारांनीही केलं मतदान.

शिवसेनेचे परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत संपर्कात नसल्याची माहिती होती. मात्र, सकाळी अकरा वाजेच्या सुमारास तानाजी सावंत विधान भवनात मतदानासाठी दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे हे संपर्काबाहेर असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. मात्र, ते मतदानासाठी लवकरच दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. अण्णा बनसोडे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत.

महाराष्ट्रात सहाव्या जागेचा पेच :-  महाराष्ट्रात सहा जागांसाठी निवडणूक होतेय. शिवसेना आणि भाजपने सहाव्या जागेसाठी उमेदवार दिलीये. धनंजय महाडिक (भाजप) आणि संजय पवार (शिवसेना) यांच्यात सहाव्या जागेसाठी लढत होणार आहे. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या आमदारांना एकत्रित आणून तटबंदी केलीये. त्यामुळे या चारही राज्यात कळीच्या ठरलेल्या प्रत्येकी एका जागेवर कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित
Rajya Sabha Election : काय केल्याने आमदाराचं मत होईल बाद?

कर्नाटकातील राज्यसभेचं गणित काय? : - कर्नाटकात चार जागांसाठी मतदान होत आहे. चार उमेदवार सहज विजयी होतील, अशी स्थिती कर्नाटकात होती. पण काँग्रेसने मन्सूर अली यांना दुसरा उमेदवार म्हणून मैदानात उतरवलं आहे. हे बघून भाजपनंही विधान परिषद आमदार लहर सिंह यांना तिसरा उमेदवार म्हणून तिकीट दिलंय. २२४ सदस्यसंख्या असलेल्या कर्नाटक विधानसभेत राज्यसभेच्या एका जागेसाठी ४५ मतं आवश्यक आहे. काँग्रेसजवळ ७० आमदार आहेत. काँग्रेसने जयराम रमेश आणि मन्सूर अली खान यांना उमेदवारी दिलीये. आता काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडणूक आणण्यासाठी २० मतं आवश्यक आहेत. भाजपकडे १२१ आमदार आहेत. भाजपने निर्मला सीतारमन, कन्नड चित्रपट अभिनेते जग्गेश आणि लहर सिंह यांना उमेदवारी दिलीये. त्यामुळे भाजपलाही तिन्ही उमेदवार निवडणूक आणण्यासाठी १४ मतं आवश्यक आहेत. जेडीएसजवळ ३२ आमदार असून, जेडीएसने डी. कुपेंद्र रेड्डी यांनी उमेदवारी दिलीये. रेड्डी यांना जिंकून येण्यासाठी १३ आणखी मतं लागणार आहेत.

हरयाणातील दुसऱ्या जागेसाठी 'फाईट' :-  हरयाणात भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी एक जागा सहज जिंकू शकतात. अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा यांनी मात्र समीकरण बिघडवलं आहे. दुसऱ्या जागेमुळे घोडेबाजार होण्याची भीती काँग्रेसला आहे. त्यामुळे काँग्रेस आपले आमदार थेट छत्तीसगढला पाठवलेत. कार्तिकेय शर्मा अजय माकन यांना चांगलं आव्हान देऊ शकतात. ९० सदस्य असलेल्या हरयाणा विधानसभेत काँग्रेसकडे ३१, तर भाजपकडे ४१ आमदार आहेत. त्यामुळे भाजपची १० मतं शिल्लक राहतात. भाजपचा मित्र पक्ष जेजेपीकडे १० आमदार आहेत. ६ अपक्ष आहेत, तर १ आमदार एचएलपी पार्टीचा आहे. त्यामुळे कार्तिकेय यांना २७ मतं मिळू शकतात.

राजस्थानात काय स्थिती? :- सत्तेत असलेल्या राजस्थानात काँग्रेसने मुकुल वासनिक, रणदीप सुरजेवाला आणि प्रमोद तिवारी यांना उमेदवारी दिलीये. भाजपने घनश्याम तिवारी यांनी उमेदवारी दिलीये, तर अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पाठिंबा दिलाय. काँग्रेसकडे १०८ आमदार आहे. त्यामुळे काँग्रेस दोन जागा सहज जिंकू शकते असं चित्र आहे. दोन जागांसाठी आवश्यक असलेल्या मतांचा कोटा पूर्ण होऊन काँग्रेसकडे २२ मतं शिल्लक राहतात. तिसरी जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १५ मतांची गरज आहे. त्यामुळे तिन्ही जागा जिंकण्यासाठी काँग्रेसला १२३ मतांची गरज आहे. दुसरीकडे भाजपकडे ७१ आमदार आहेत. त्यामुळे भाजप एक जागा सहज जिंकू शकते. पण तरीही भाजपकडे ३० मतं जास्त आहेत. त्यामुळे आरएलपी आणि भाजप यांची मिळून ३३ मतं शिल्लक उरतात. त्यामुळे चंद्रा यांना विजयी होण्यासाठी ८ मतांचीच गरज आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असून, आता शिवसेनेचे आमदार मतदान करण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडून विधानभवनात दाखल झाले आहेत. शिवसेनेचे दोन उमेदवार रिंगणात असून, संजय राऊत यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दुसरीकडे सहाव्या जागेवर शिवसेनेनं संजय पवार यांना उमेदवारी दिलीये.

Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित
Rajya sabha : आजाराने त्रस्त असूनही भाजपचे लक्ष्मण जगताप करणार मतदान, रूग्णवाहिकेतून मुंबईत

मतदानाचे ताजे अपडेट - मतदान सुरू झाल्यानंतर पहिल्या तासाभरात ६० आमदारांनी मतदान केलं आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ आमदारांनी, तर भाजपाच्या २२ आमदारांनी मतदानांचा हक्क बजावला. काँग्रेसच्या १४ आमदारांनी मतदान केलं.

असं आहे संख्याबळ : - भाजपचे १०६ आमदार, शिवसेनेचे ५५, राष्ट्रवादी ५३ आमदार (मलिक आणि देशमुख मतदान करू शकणार नाहीत), काँग्रेसचे ४४ आमदार, अपक्ष व छोटे पक्ष २९ आमदार. राज्यसभेत निवडणूक येण्यासाठी आवश्यक असणारी मते ४१.०१ मते.

Live Update : राज्यसभा निवडणूक : क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदार भाजपतून निलंबित
बंटी पाटील मुन्ना महाडिकांना विजयाचा गुलाल उधळू देणार?, दोघांमधील संघर्ष कधी उफाळून आला?

रिंगणात असलेले उमेदवार :- प्रफुल्ल पटेल (राष्ट्रवादी काँग्रेस), संजय राऊत (शिवसेना), पीयूष गोयल (भाजप), इम्रान प्रतापगढी (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय पवार (शिवसेना), धनंजय महाडिक (भाजप).

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in