Solapur: क्रूर थट्टा! 512 किलो कांदे विकले, शेतकऱ्याला मिळाले 2 रुपये
Onion farmers in trouble : सोलापूर : राज्यभरात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे. (Onion farming) कांद्या उत्पादनातून नफा तर सोडा लावणीला आलेला खर्च सुद्धा निघत नसल्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Solapur district) सोलापूर जिल्ह्यात देखील याचा फटका (Farmers) शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. एका शेतकऱ्याला तर […]
ADVERTISEMENT
Onion farmers in trouble : सोलापूर : राज्यभरात कांद्याच्या दरात घसरण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा नुकसान सहन करावा लागत आहे. (Onion farming) कांद्या उत्पादनातून नफा तर सोडा लावणीला आलेला खर्च सुद्धा निघत नसल्याची दुर्दैवी वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. (Solapur district) सोलापूर जिल्ह्यात देखील याचा फटका (Farmers) शेतकऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. एका शेतकऱ्याला तर चक्क 512 किलो कांद्याचे फक्त 2 रुपये मिळाल्याचं समोर आलं आहे.(swabhiman shetkari sanghtana raju shetti) स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टींनी याबाबत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. (Rs 2 received in return for 512 kg of onions)
ADVERTISEMENT
मोडला नाही कणा…नापिकीला कंटाळून दुग्धव्यवसायाकडे वळलेला शेतकरी कमावतोय लाखोंमध्ये
2 रुपयाचं चेक, हातात पैसे मिळायला लागणार 15 दिवस
सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर दिवसरात्र राबुन मोठ्या कष्टाने राजेंद्र चव्हाण या शेतकऱ्याने कांद्याचं उत्पादन घेतलं होतं. पिकवलेल्या 512 किलो कांद्याचे फक्त 2 रुपये पदरात पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय. शेतकऱ्याला 2 रुपये देखील चेकच्या माध्यमाने देण्यात आले आहे. चेक क्लियर होण्यासाठी 15 दिवस लागतात. शेतकऱ्याची किती क्रूर चेष्टा होत आहे, याचं उदाहरण या घटनेतून समोर आलं आहे.
हे वाचलं का?
अशी झाली शेतकऱ्याची क्रूर थट्टा
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बोरगाव (झाडी) या गावातील राजेंद्र तुकाराम चव्हाण या शेतकऱ्याने आपल्या 2 एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. कांद्यातून मिळालेल्या पैशातून आपल्यावर असलेले देणे देऊ, असा उद्देश राजेंद्र चव्हाण यांचा होता. चव्हाण यांनी 17 फेब्रुवारी 2023 रोजी 10 पोते कांदा सोलापुरातील मार्केटमध्ये घेऊन गेले. 10 पोते कांद्याचे वजन 512 किलो झाले मात्र कांद्याचे दर घसरल्याने शेतकऱ्याला प्रति किलो 1 रुपया प्रमाणे भाव मिळाला.
वाहनभाडे, हमाली, तोलाई याचे पैसे वजा करून फक्त दोन रुपये शिल्लक राहिले. कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाऱ्याने दोन रुपयांचा चेक राजेंद्र चव्हाण यांच्या नावे दिला. राजेंद्र चव्हाण यांची हीच व्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर मांडली. व्यापाऱ्याला दोन रुपयाचा चेक देताना लाज कशी वाटली नाही? असा सवाल विचारत राज्यकर्त्यांवर देखील टीका केली.
ADVERTISEMENT
Union Budget 2023 : शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या बजेटमध्ये काय?
ADVERTISEMENT
कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे सगळे आरोप फेटाळले
दरम्यान या सगळ्या संदर्भात कांदा व्यापाऱ्याने शेतकऱ्याचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. व्यापाऱ्याच्या दाव्यानुसार शेतकरी राजेंद्र चव्हाण यांनी 31 डिसेंबर पासून त्यांच्याकडे कांदा विक्री सुरुवात केली. एकूण पाच वेळा कांदा विक्री केल्यानंतर त्या मोबदल्यात त्यांना दोन लाख तीस हजार रुपये देण्यात आले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी आणलेला कांदा हा उरलेला खराब कांदा होता. त्यामुळे त्यांना भाव आले नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT