NCP : ‘दादा होण्याची स्पर्धा सुरु’, अमोल मिटकरींचा कुणाला टोला
आजकाल दादा होण्याची स्पर्धा सुरु झाली आहे, असा टोला मिटकरी यांनी रोहित पवारांना लगावला. तसेच रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोनच शिव, शाहू – फुले, आंबेडकरांचे वारसदार असल्याचा टीका देखील मिटकरी यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार गटाकडून आमदार रोहित पवार अजित पवार गटावर टीका करत असतात. या टीकांना आता अजित पवार गटाकडून आमदार अमोल मिटकरींनी प्रत्युत्तर दिलं आहे. आजकाल दादा होण्याची स्पर्धा सुरु झाली आहे, असा टोला मिटकरी यांनी रोहित पवारांना लगावला. तसेच रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोनच शिव, शाहू – फुले, आंबेडकरांचे वारसदार असल्याचा टीका देखील मिटकरी यांनी केली आहे.(ajit pawar group amol mitkari criticize rohit pawar jitendra awhad ncp splits washim)
ADVERTISEMENT
वाशिममध्ये आज अजित पवार गटाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीतून बोलताना अमोल मिटकरी यांनी खळबळजनक विधान केले आहे. वाय.बी. सेंटरमध्ये ज्यावेळेस शरद पवार बोलत होते. त्यावेळी आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे, भाजपा सोबत गेलो पाहिजे, अशा रोहित पवारांच्या भावना असल्याचे अमोल मिटकरी यांनी सांगितले. त्यामुळे भाजप सोबत जाण्याची पहिली भावना रोहित पवारांची होती, असे अमोल मिटकरी यांनी सांगितले. तसेच रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड हे दोनच शिव, शाहू – फुले, आंबेडकरांचे वारसदार असल्याचा टोला देखील अमोल मिटकरींना लगावला.
हे ही वाचा : राष्ट्रपती राजवट: ‘तुमच्याकडे बहुमत होतं तर मला का विचारलं?’, शरद पवारांनी गाठलं फडणवीसांना खिंडीत
सुप्रिया सुळे अधिवेशनाच्या भाषणात म्हटले होते की, फार कमी अशा बहिणी असतात, ज्यांच्या पाठीमागे भाऊ उभा राहतो. यावर मिटकरी म्हणाले की, मी त्यांच्या मताशी शंभर टक्के सहमत आहे. कारण बारामती लोकसभा मतदार संघातून इतक्या वर्षापासून सुप्रिया सुळे निवडून येण्याचे कारण म्हणजे अजित पवार आहेत असे अमोल मिटकरी म्हणाले.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Sharad Pawar : 2024 नंतर राजकारणातून निवृत्त होणार का?; पवार म्हणाले…
शरद पवारांचे फडणवीसांना प्रत्युत्तर
इंडिया टुडे कॉनक्लेव्हमध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना देखील आमंत्रित करण्यात आलं होतं. जिथे शरद पवार यांना देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रपती राजवटीबाबत जे भाष्य केलं होतं त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्याचबाबत शरद पवार बोलताना म्हणाले की, ‘मी काही सरकारमध्ये नव्हतो, सरकारमध्ये भाजप होतं. त्यांना जास्त जागा मिळाल्या होत्या. राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय त्यांचा होता. अशावेळी जर त्यांनी मला किंवा इतर कोणालाही याबाबत विचारलं तर त्याला आम्ही का नाही म्हणावं?’‘इथे मला आणखी एक गोष्ट विचारायची आहे. त्यांना स्पष्ट बहुमत मिळालेले. मग ते मला का विचारत होते? जर त्यांच्याकडे बहुमत होतं तर त्यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय का घेतला?’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT