Arvind Kejriwal :  "हवालामार्गे 45 कोटी...", केजरीवाल अडकणार; कोर्टात काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अरविंद केजरीवाल यांना अटक केल्यानंतर कोठडीसाठी कोर्टात सुनावणी झाली.
अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल ईडीचे कोर्टात गंभीर दावे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अरविंद केजरीवाल अटक

point

केजरीवालांवर ईडीने काय केले आरोप?

point

ईडीने केजरीवालांच्या अटकेची केली मागणी

Arvind Kejriwal Hearing latest News : मद्य धोरण घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणी वाढू शकतात. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू कोर्टात ईडीने केजरीवालांच्या कोठडीसाठी युक्तिवाद केला. केजरीवाल यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी हे हजर होते. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस.व्ही. राजू यांनी ईडीच्या वतीने युक्तीवाद केला. न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी कोर्टरूममध्ये उपस्थित लोकांना कोर्टात गर्दी न करण्याची विनंती केली आहे. त्या म्हणाल्या की, "आमच्याकडे मर्यादित जागा आहेत." (ED claims in court that, We have strong evidence against Arvind kejriwal for demanding bribe)

ADVERTISEMENT

मद्य घोटाळा प्रकरणाची सुनावणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टात सुरू झाली. यावेळी ईडीने केजरीवाल यांच्याबाबत अनेक दावे केले आहेत. ईडीने दोन लोकांमधील चॅटचा हवाला दिला, ज्यामध्ये रोख रकमेची चर्चा केली जात होती. हवालाच्या माध्यमातून ४५ कोटी रुपये गोव्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे ईडीने सांगितले. 

हवालामार्गे गोव्यात पाठवला पैसा; ईडीचा दावा

वेगवेगळ्या लोकांना मोठ्या रकमा दिल्या. आम्ही या लोकांचे सीडीआर तपशील मिळवले आहेत. त्यांचे फोन रेकॉर्डही आमच्याकडे आहेत. विजय नायर यांच्या एका कंपनीकडूनही पुरावे मिळाले आहेत. हे पैसे चार मार्गांनी गोव्यात पाठवण्यात आले, असा दावा ईडीने कोर्टात केला आहे. 

हे वाचलं का?

मद्य घोटाळ्यातील आरोपी कविता यांचेही जबाब घेण्यात आल्याचे ईडीने न्यायालयाला सांगितले. नोंदवलेल्या जबाबानुसार, केजरीवाल यांनी कविता यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितले की आपण दिल्ली मद्य धोरणावर एकत्र काम करू", असेही ईडीने सांगितले.

हेही वाचा >> "माढ्यातील एक खासदार पडला, तर...", रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा 

ईडीने कोर्टात दावा केला की, "दोन वेळा रोख हस्तांतरित करण्यात आले. मद्य घोटाळ्यातील आरोपी विजय नायर हे केजरीवाल यांच्यासाठी काम करत होते. नायर हे प्रत्यक्षात केजरीवाल यांच्या घराजवळ राहत होते. ते केजरीवाल यांच्या जवळचे होते. ते प्रत्यक्षात दलाल म्हणून काम करत होते. केजरीवाल यांनी दक्षिणेकडील लॉबीकडे लाच मागितली होती. त्यांच्याविरुद्ध लाच मागितल्याप्रकरणी आमच्याकडे सबळ पुरावे आहेत."

ADVERTISEMENT

"मद्य धोरणात केजरीवालांचा सहभाग"

राऊस एव्हेन्यू कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान ईडीने कोर्टाला सांगितले की, "अरविंद केजरीवाल हे दिल्ली मद्य घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. दिल्ली मद्य धोरण तयार करण्यात केजरीवाल यांचा थेट सहभाग आहे. केजरीवाल यांनी लाच घेण्यात काही लोकांची बाजू घेतली. गुन्ह्यातून मिळालेली रक्कम आम आदमी पक्षाकडून गोवा निवडणुकीसाठी वापरली गेली."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> CM केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरेंना 'मेसेज'

राऊस एव्हेन्यू न्यायालयात सुनावणी सुरू होताच, ईडीने केजरीवाल यांच्या अटकेचे कारण स्पष्ट करणारे 28 पानांचे युक्तिवाद न्यायालयात सादर केले आहेत. ईडीचे वकील अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू यांनी न्यायालयाला सांगितले की, "आरोपीला (केजरीवाल) गुरुवारी रात्री ९.०५ वाजता अटक करण्यात आली. त्याला २४ तासांच्या आत कोर्टात हजर करण्यात आले आहे. आम्ही त्याची १० दिवसांची कोठडी मागितली आहे. आम्ही सर्व तरतुदींचे पालन केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती देण्यात आली." ईडीने केजरीवाल यांच्या अटकेची आणि त्यांच्या घरावरील छाप्याची फाईलही न्यायालयाला दाखवली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT