Lok Sabha Elections 2024 : "माढ्यातील एक खासदार पडला, तर...", रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा
Ramraje Naik Nimbalkar vs Ranjeetsingh Naik Nimbalkar : माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे.
ADVERTISEMENT
Ramraje Naik Nimbalkar vs Ranjeetsingh Naik Nimbalkar : माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी विरोध केला आहे.
Madha lok sabha elections 2024 : भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीतील असंतोष समोर आला आहे. धैर्यशील मोहित पाटील यामुळे नाराज असल्याचे दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला स्पष्ट इशारा देत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
रामराजे नाईक निंबाळकर यांनी गुरूवारी (21 मार्च) फलटण येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजपला स्पष्ट इशारा दिला आहे. "माढ्यातील एक खासदार पडला तर दिल्लीतील लोकांना काय फरक पडतोय", असे मोठे विधान रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
मतदान कमी झालं म्हणून...; रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा
माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेल्याने रामराजे नाईक निंबाळकर नाराज आहेत. ही नाराजी बोलून दाखवताना ते म्हणाले, "आज फक्त फलटणचा प्रश्न नाही, तर खटाव आणि माणचाही प्रश्न आहे. आता मी ठराविक लोक घेऊन अजितदादांना जाऊन भेटणार आहे."
हे वाचलं का?
हेही वाचा >> CM केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकतात का?
"त्यांना स्पष्टपणे सांगणार आहे की, भाजपला इतक्या विरोधानंतरही उमेदवार कायम ठेवायचा असेल, तर मतदान कमी झालं म्हणून आम्ही जबाबदार राहणार नाही. हे आपण अजित पवारांना स्पष्टपणे सांगून येऊ. मग तुम्हाला काय करायचे ते करा", असे रामराजे निंबाळकरांनी कार्यकर्त्यांशी बोलताना सांगितले.
हेही वाचा >> कोणत्या पक्षाला किती इलेक्टोरल बॉड मिळाले? SBI ची संपूर्ण लिस्ट
"शेवटी देशभरात 542 खासदार आहेत. एखाद दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय? पण यांना वाटतं की, आपण म्हणजे फार मोठे खासदार आहोत. यांच्याबद्दल काय बोलावं आणि किती बोलावं? त्यांच्याबद्दल बोलून आता मला कंटाळा आला आहे", अशी टीका रामराजे नाईक निंबाळकरांनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT