इंस्टाग्रामवर दोन मुलांच्या आईचे पुरुषाशी जुळले सूत अन् चार वर्षांच्या मुलीसोबत गेली पळून! पती पोलिसात गेला अन्...
एका विवाहित महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत सूत जुळले आणि पती तसेच मुलांचा कसलाही विचार न करता ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त पतीने अखेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
इंस्टाग्रामवर दोन मुलांच्या आईचे पुरुषाशी जुळले सूत अन्...
विवाहिता चार वर्षांच्या मुलीसोबत गेली पळून!
Crime News: विवाहबाह्य संबंधाची बरीच धक्कादायक प्रकरणे उघडकीस येत असतात. उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथून देखील असंच एक प्रकरण समोर आलं आहे. एका विवाहित महिलेचे दुसऱ्याच पुरुषासोबत सूत जुळले आणि पती तसेच मुलांचा कसलाही विचार न करता ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या पत्नीच्या कृत्यामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त पतीने अखेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला.
संबंधित प्रकरण सफदरगंज पोलीस स्टेशन हद्दीतील असून येथील कमल (काल्पनिक नाव) नावाचा एक तरुण आपल्या पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. दरम्यान, संबंधित तरुणाची पत्नीची इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका विवेक (बदललेले नाव) नावाच्या तरुणाशी ओळख झाली. त्यानंतर, त्या दोघांचं एकमेकांसोबत चॅटिंग सुरू झालं आणि काही दिवसांनंतर, दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर सुद्धा एक्सचेंज केले.
हे ही वाचा: पुण्यातील सॉफ्टवेअर इंजीनिअरला जुगाराचा नाद... आर्थिक नुकसान अन् चार्जिंग केबलने फाशी घेत टोकाचं पाऊल!
चार वर्षांच्या मुलीला घेऊन प्रियकरासोबत फरार
कालांतराने, त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले आणि कमलला आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची अजिबात कल्पना नव्हती. त्यानंतर, एके दिवशी आपल्या चार वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन ती महिला घरातून पळून गेली. विवाहितेचा शोध घेतल्यानंतर, ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं समोर आलं. हे कळताच कमलच्या पायाखालची जमिनच सरकली.
हे ही वाचा: मुंबई महापालिकेत पराभूत झाले तर उद्धव ठाकरेंचं राजकारण संपणार का? एकनाथ शिंदेंचं उत्तर ऐकून भुवया उंचावल्या
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेला दोन मुलं असून ती तिच्या चार वर्षांच्या मुलीला घेऊन आधी माहेरी गेली आणि नंतर, ती अचानक तिथून गायब झाली. त्यावेळी, विवाहितेच्या भावाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर, ती तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याचं समोर आलं. महिलेचा पती त्याच्या मेहुण्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेला असता तो म्हणाला की, "काही दिवसांपूर्वी एका महिलेने मला सांगितलं होतं की, तिच्या पतीसोबत माझ्या पत्नीचे अनैतिक संबंध सुरू आहेत. तो पुरुष गुजरातमध्ये राहतो मात्र, त्यावेळी मी त्या महिलेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि आता ती खरंच त्याच्यासोबत पळून गेली." या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, गुन्हा दाखल करण्यात आला असून ती आपल्या चार वर्षांच्या मुलीला सोबत घेऊन घरातून फरार झाली. आता या प्रकरणाचा सखोल तपास केला जात असल्याचं सांगण्यात येत आहे.










