Arvind Kejriwal arrested : CM केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकतात का?
Chief Minister Arvind Kejriwal arrested : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणून ते तुरुंगातून सरकार चालवू शकतात की, त्यांना राजीनामा द्यावा लागेल?
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

अरविंद केजरीवाल यांना ईडीने केली अटक

दिल्लीत राजकीय संकट

केजरीवाल राजीनामा देणार की तुरुंगातून सरकार चालवणार?
Delhi Chief Minister Arvind Kejriwal arrested by ED : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. गुरुवारी (२१ मार्च) दोन तास चौकशी केल्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने केजरीवालांना अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. (Will Chief Minister Arvind Kejriwal have to resign or will he be able to run the government from jail?)
अरविंद केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांना पदावर असताना अटक झाली आहे. त्यांच्याआधी काही दिवसांपूर्वी वर्षी झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही अटक करण्यात आली होती, पण त्यांनी अटकेपूर्वी राजीनामा दिला होता.
आम आदमी पार्टीने मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला 'राजकीय षडयंत्र' म्हणत भाजपवर आरोप सुरू केले आहेत. सर्व विरोधी पक्षांनीही या अटकेला चुकीचे ठरवले आहे. केजरीवालांच्या सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या की, अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील."
आतिशी म्हणाल्या, "आम्ही आधीच सांगितलेले आहे की, गरज पडल्यास केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवतील. ते तुरुंगातून सरकार चालवू शकतात आणि कोणताही नियम त्यांना तसे करण्यापासून रोखू शकत नाही. त्यांना दोषी ठरवण्यात आलेले नाही, त्यामुळे ते दिल्लीचे मुख्यमंत्री राहतील."