मुंबईच्या महापौर पदाबाबत एकनाथ शिंदे यांचं सुचक वक्तव्य म्हणाले, 'महापौर हा...'

मुंबई तक

Eknath shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपल्या नगरसेवकांना ताज लँड्स हॉटेलमध्ये नेलं. यामुळे पुन्हा एकदा राजकीय नाट्य बघायला मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी 18 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत मुंबईचा महापौर कोण होईल? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

ADVERTISEMENT

Eknath shinde
Eknath shinde
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करतील का?

point

मुंबईचा महापौर हा... काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

Eknath Shinde : राज्यात महापालिका निवडणुकीची धामधूम सुरु होती, याच महापालिकेचा निकाल आता समोर आला आहे. महापालिका निवडणुकीत सर्वात चर्चेत राहिलेली महापालिका म्हणजे मुंबई महापालिका होती. याच मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव केला. तसेच शिंदेसेनेला म्हणावी अशी मतं पडली नाहीत, त्याहून अधिक मतं ही ठाकरेंच्या शिवसेनेला पडल्याचं दिसून आलं. यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या नगरसेवकांसोबत ताज लँड्स हॉटेलमध्ये आहेत. यामुळे पुन्हा एकदा राजकीय नाट्य बघायला मिळणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर एकनाथ शिंदे यांनी 18 जानेवारी रोजी पत्रकार परिषद घेत मुंबईचा महापौर कोण होईल? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.

हे ही वाचा : मालकिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ बनवला, मित्रासोबत मिळून दोन महिने अत्याचार, 'असं' बाहेर आलं प्रकरण

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे सत्ता स्थापन करतील का?

मुंबईवर शिवसेनेचा महापौर व्हावा अशी एकनाथ शिंदे यांची मागणी असल्याच्या चर्चा वृत्तमाध्यमावर आहेत. अशा स्थितीत त्यांचे काही नगरसेवक हे हॉटेलवर असल्याचं सांगण्यात येत आहे. काही नगरसेवक हे नॉटरिचेबल लागत असल्याच्या चर्चांना उधाण आहेत. यामुळे आता पु्न्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येतील आणि काँग्रेसला सोबत घेऊन मुंबई महापालिकेवर सत्ता स्थापन करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

एकनाथ शिंदे यांनी आपले नगरसेवक हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याचं कारण सांगितलं. ते म्हणाले की, 'काही नगरसेवक हे नवीन आहेत, त्यांना काम कसं करता येईल याबाबत सांगण्यात येत आहे. कामकाजाच्या स्वरुपाची माहिती देण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे. याबाबत मी त्यांना मार्गदर्शन केलं आहे,' असं ते म्हणाले. 

हे ही वाचा : शिंदे गट, कलानी अन् इदनानी एकत्र लढले; तरी ठरले अपयशी, उल्हासनगरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

'मुंबईचा महापौर हा...' काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

त्याचबरोबर ते म्हणाले की, 'शिवसेनेला कोणतंही गालबोट लागू नये, तुमच्या वागण्यावर आणि बोलवण्यावर लोकांचं लक्ष असतं. कोणालाही वाईट वाटू नये. लोकांना निवडून दिलेला प्रतिनिधी हा चांगलाच वाटावा, अशा काही सूचना दिल्या आहेत', असं ते म्हणाले आहेत. त्यानंतर महापौरपदाबाबत विचारलं असता, त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सांगितलं की, 'मुंबई महापालिकेचा महापौर हा महायुतीचा होणार', असं ते म्हणाले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp