15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही, 30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला

मुंबई तक

Mumbai Mahapalika Election Results 2026 : विशेष म्हणजे या वॉर्डमधून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराच्या पत्नीचं 15 दिवसांपूर्वी निधन झाल होतं. तरी देखील न खचता त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. अनिल कदम असं या शिवसैनिकाचं नाव आहे. दरम्यान, विजय मिळवल्यानंतर अनिल कदम नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

ADVERTISEMENT

Shivsena
Shivsena
social share
google news

बातम्या हायलाइट

point

15 दिवसांपूर्वी पत्नीचं निधन, ठाकरेंचा शिलेदार खचला नाही

point

30 वर्षांच्या संघर्षानंतर शिवसेनेने मुंबईतील 'हा' वार्ड जिंकला

Mumbai Mahapalika Election Results 2026 : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीने विजय मिळवला असला तरी ठाकरे बंधूंनी कडवी झुंज दिली. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निम्म्याहून अधिक नगरसेवक सोडून गेलेले असताना त्यांनी 65 नगरसेवक निवडून आणण्याचा पराक्रम केला. या निवडणुकीत ठाकरेंचे अनेक कार्यकर्ते निष्ठेने लढले.  ठाकरेंच्या शिवसेनेने वडाळ्यातील 181 क्रमाकांचा वॉर्ड 30 वर्षांच्या संघर्षानंतर जिंकलाय. विशेष म्हणजे या वॉर्डमधून निवडणूक लढणाऱ्या उमेदवाराच्या पत्नीचं 15 दिवसांपूर्वी निधन झाल होतं. तरी देखील न खचता त्यांनी निवडणूक लढवली आणि विजयश्री खेचून आणली. अनिल कदम असं या शिवसैनिकाचं नाव आहे. दरम्यान, विजय मिळवल्यानंतर अनिल कदम नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात.. 

हेही वाचा : मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी दिलासा! लोकल ट्रेन वेळेवर धावणार; विलंब कमी होणार, नवीन कॉरिडोरविषयी जाणून घ्या...

वडाळ्यातील 181 क्रमाकांच्या वार्डातून विजय मिळवल्यानंतर अनिल कदम यांनी 'मुंबई तक'ला प्रतिक्रिया दिलीये. ते म्हणाले, उद्धव ठाकरे साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला. वडाळ्यातील 181 क्रमाकांच्या वॉर्डमधून कधीही शिवसेना उमेदवार निवडून आलेला नव्हता. मी काँग्रेस पक्षात होतो. मी 5 वर्षांपूर्वी शिवसेनेत आलो. यापूर्वी माझी पत्नी याठिकाणी नगरसेविका होती. 1 जानेवारी रोजी तिचं निधन झालं. आज तिला जाऊन 17 दिवस झाले. तेवढा टेंशनचा विषय असून सुद्धा मुंबईचा विषय आहे, मुंबई वाचवायची आहे. आपल्यावर संकट कोसळलेलं आहे. पण मुंबईवर येणारं संकट देखील मोठं आहे. या सगळ्या गोष्टी आणि महापुरुषांचा त्याग पाहिल्यानंतर आपला त्याग त्यांच्यापुढे काहीच नाही. त्यामुळे आम्ही जिद्दीने मैदानात उतरलो. आम्ही 8 दिवसात ती निवडणूक लढली. आमच्या विरोधात करोडो रुपयांचा पाऊस पाडण्यात आला होता. एक मत 5 हजार रुपयांत विकत घेतल्या गेलं.

Uddhav Thackeray यांच्या शिवसेनेचे नगरसेवक अनिल कदम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत विजयी | Shiv Sena UBT

 

हे वाचलं का?

    follow whatsapp