मुंबईची खबर: मुंबईकरांसाठी दिलासा! लोकल ट्रेन वेळेवर धावणार; विलंब कमी होणार, नवीन कॉरिडोरविषयी जाणून घ्या...
मुंबईतील दादर ते नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ला जोडणारा समर्पित फ्रेट कॉरिडोर लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होईल. हे कॉरिडोर सुरू झाल्यानंतर, मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या वेळापत्रकात चांगलाच सुधार होणार असल्याची अपेक्षा आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आता, लोकल ट्रेन वेळेवर धावणार, विलंब कमी होणार
मुंबई रेल्वेच्या नवीन कॉरिडोरविषयी जाणून घ्या...
Mumbai News: मुंबईतील दादर ते नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ला जोडणारा समर्पित फ्रेट कॉरिडोर लवकरच पूर्णपणे कार्यान्वित होईल. वृत्तानुसार, एप्रिलमध्ये त्याचं कामकाज सुरू होईल. हे कॉरिडोर सुरू झाल्यानंतर, मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कच्या वेळापत्रकात चांगलाच सुधार होणार असल्याची अपेक्षा आहे. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कॉरिडॉरच्या बांधकामामुळे पश्चिम रेल्वेच्या विद्यमान ट्रॅकवरील मालगाड्यांचा प्रचंड ताण कमी होईल, ज्यामुळे लोकल आणि मेल-एक्सप्रेस गाड्यांना अधिक सोयीस्कर मार्ग तसेच पुरेसा वेळ मिळेल.
दररोज 50 ते 55 मालगाड्या धावतात
मिळालेल्या माहितीनुसार, आता पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर दररोज 50 ते 55 मालगाड्या धावतात. या मालगाड्यांना वारंवार प्राधान्य दिल्यामुळे, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो आणि विलंब होणे, ही बाब सामान्य झाली आहे. एप्रिलपासून, या सर्व मालगाड्या नवीन समर्पित कॉरिडॉरमध्ये शिफ्ट केल्या जातील, ज्यामुळे सामायिक ट्रॅक प्रवासी रेल्वे ऑपरेशन्ससाठी पूर्णपणे उपलब्ध होईल.
हे ही वाचा: Govt Job: सरकारी बँकेत नोकरी हवीये? पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, 'नाबार्ड'च्या 'या' भरतीमध्ये सहभागी व्हा...
स्थानिक प्रवाशांच्या प्रवासावर थेट परिणाम
या मालगाडीची लांबी जवळपास दीड ते दोन मेल/ एक्स्प्रेस ट्रेन इतकी असेल. अशातच, मालवाहतूक सेवांसाठी स्वतंत्र ट्रॅक उपलब्ध झाल्यामुळे एकूण ट्रॅक क्षमतेत लक्षणीय वाढ होईल आणि याचा थेट परिणाम स्थानिक प्रवाशांच्या प्रवासावर होईल, म्हणजेच लोकल ट्रेन वेळेवर धावतील, लोकल काउन्सिल कमी होईल आणि भविष्यात आणखी मेल-एक्सप्रेस ट्रेन देखील चालवल्या जातील. या फ्रेट कॉरिडोरचा आणखी मोठा फायदा म्हणजे माल आणि प्रवासी ट्रेनचं संचालन एकमेकांपासून स्वतंत्र होतील. यामुळे, सुरक्षितता आणि विश्वसनीयता तर वाढेलच पण चांगली वारंवारता तसेच अधिक सोयीस्कर प्रवास अनुभव मिळण्याची शक्यता आहे.
पूर्वी: एकाच ट्रॅकवर- लोकल+ मालगाडी
आता: लोकल/ एक्स्प्रेस आणि मालगाड्यांसाठी स्वतंत्र कॉरिडोर










