मंगेश काळोखे हत्याप्रकरणातील राष्ट्रवादीचा आरोपी नेता फरार, तर एकाच्या आवळल्या मुसक्या

मुंबई तक

Mangesh Kalokhe : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी म्हणजे 26 डिसेंबर रोजी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे प्रवक्ते भरत भगत यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांना या प्रकरणातील सखोल माहिती घेतील.

ADVERTISEMENT

Mangesh Kalokhe
Mangesh Kalokhe
social share
google news

बातम्या हायलाइट

point

11 आरोपींना 13 दिवसाच्या पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कस्टडी

point

प्रवक्ते भरत भगत फरार 

Mangesh Kalokhe : नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या काही तासांपूर्वी म्हणजे 26 डिसेंबर 2024 रोजी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे प्रवक्ते भरत भगत यांना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन प्रक्रियेनंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पोलीस या प्रकरणातील सखोल माहिती घेत आहेत. तसेच त्यांच्या अटकपूर्व जामिनाला यापूर्वीच फेटाळण्यात आले असल्याचं सांगण्यात येत आहे.  

हे ही वाचा : नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

11 आरोपींना 13 दिवसाच्या पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कस्टडी

खोपोली नगरपालिकेत पराभव जिव्हारी लागल्याने राष्ट्रवादीचे पराभूत उमेदवार उर्मिला देवकर यांचे पती व दोन मुले यांच्यासह एकूण 15 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी 11 आरोपींना 13 दिवसांच्या पोलीस कस्टडीनंतर न्यायालयीन कस्टडी सुनावण्यात आली होती. तसेच इतर  3 आरोपींना पोलीस कस्टडीत कायम ठेवण्यात आले होते.

हे ही वाचा : बीड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत माजी आमदाराचा शिवसेनेत प्रवेश

प्रवक्ते भरत भगत फरार 

अशातच हत्येचा कट रचण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे फरार असून प्रवक्ते भरत भगत फरार असल्याचं वृत्त होतं. अशातच पोलिसांना त्यांच्या तालुका हद्दीत मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. नंतर त्याला खालापूर कोर्टात हजर करण्यात आले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अद्याप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे फरार असून त्यांना कधी अटक होते जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp