नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

मुंबई तक

accident news : एका भरधाव वेगाने आलेल्या कारचे नियंत्रण सुटून, ती कार पाण्यात पडली. या अपघातात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

ADVERTISEMENT

accident news
accident news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वेगाने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि थेट पाण्यात कोसळली 

point

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्देवी अंत...

Accident News : उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडात एक भीषण अपघात झाल्याचं वृत्त आहे. एका भरधाव वेगाने आलेल्या कारचे नियंत्रण सुटून, ती कार पाण्यात पडली. या अपघातात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी अंत झाल्याेची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा मृत तरुण कंपनीतून येत होता. ही घटना 16 जानेवारी शुक्रवारी घडल्याचं सांगण्यात येत आहे.

हे ही वाचा :  'या' राशीतील जोडप्यांच्या प्रेम जीवनात रोमांस वाढेल, तर काही राशीतील लोकांचे आर्थिक नुकसान होणार

वेगाने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि थेट पाण्यात कोसळली 

ग्रेटर नोएडातील सेक्टर 150 नाल्याजवळील एका वळणावर एका वेगाने येणाऱ्या कारचे नियंत्रण सुटले आणि ती पाण्याच्या रिकाम्या जागेत कोसळली. या दुर्देवी अपघातात कारमधील सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी अंत झाला. पोलिसांनी आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने सुमारे दोन तासांच्या प्रयत्नानंतर कारला पाण्यातून बाहेर काढण्यात आले. 

सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्देवी अंत...

नॉलेज पार्क पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे नाव युवराज मेहता (वय 27) असे आहे. तो आपल्या कुटुंबासोबत सेक्टर 150 येथील टाटा युरेका सोसायटीत राहत होता. तो गुरुग्राममधील एका कंपनीतच सॉफ्टवेअर इंजिनिअरचं काम करत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 12.00 वाजण्याच्या सुमाराज युवराज त्याच्या कंपनीतून त्याच्या कारने घरी परतत होता. 

हे ही वाचा :  अंगावर पाच किलो सोने, चार किलो चांदीचे चप्पल, चार वेळा हल्ला... कोण आहे गुगल गोल्डन बाबा?

सेक्टर 150 जवळील एका वळणार निर्माण झालेल्या धुक्यामुळे  गाडीचे नियंत्रण सुटले आणि ते वाहन पाण्यात कोसळले. या अपघातात युवराजचा दुर्दैवी अंत झाला होता. पोलिसांनी मृताची ओळख पटवली आणि कुटुंबाला माहिती दिली, पोलीस अपघाताचा पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp