मुंबई महापालिकेत मविआ सत्तेपासून 15 जागा दूर राहिली, अन् ठाकरे गट अन् काँग्रेसला 30 जागांवर मतविभाजनचा फटका

मुंबई तक

Mumbai Mahapalika Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. शहरातील जवळपास 30 प्रभागांमध्ये या दोन पक्षांमधील मतविभाजनाचा थेट फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला झाल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Mahapalika Election 2026
Mumbai Mahapalika Election 2026
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महापालिकेत मविआ सत्तेपासून 15 जागा दूर राहिली

point

अन् ठाकरे गट अन् काँग्रेसला 30 जागांवर मतविभाजनचा फटका

Mumbai Mahapalika Election 2026, मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीला काठावरचं बहुमत मिळालंय.  सर्वात मोठा पक्ष ठरल्याने भाजप स्वाभाविकपणे त्यांचा महापौर बसावा, यासाठी प्रयत्न करणार आहे. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने अडीच वर्षे आम्हाला महापौरपद मिळावे, अशी मागणी देखील केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत कडवी झुंज देणारे ठाकरे बंधू आणि काँग्रेस केवळ 15 जागांनी सत्तेपासून दूर राहिले आहेत. शिवाय, या निवडणुकीतील महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. ठाकरे बंधू आणि काँग्रेसला 30 ठिकाणी मतविभाजनाचा फटका बसल्याचं समोर आलंय. नेमकं काय घडलंय? सविस्तर जाणून घेऊयात.. 

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसल्याचे चित्र निकालातून स्पष्ट झाले आहे. शहरातील जवळपास 30 प्रभागांमध्ये या दोन पक्षांमधील मतविभाजनाचा थेट फायदा भाजप आणि एकनाथ शिंदे गटाला झाल्याचे दिसून येत आहे. अनेक प्रभागांमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाची एकत्रित मते ही विजयी भाजप किंवा शिंदे गटाच्या उमेदवारांपेक्षा अधिक असतानाही, स्वतंत्र लढतीमुळे दोन्ही पक्षांना पराभव स्वीकारावा लागला.

काँग्रेस अन् ठाकरे गट स्वतंत्र लढल्याचा सत्ताधाऱ्यांना फायदा? 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस एकत्र लढले होते. त्या वेळी मनसे ही महाविकास आघाडीचा भाग नव्हती. मात्र यंदाच्या महापालिका निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाली, तर काँग्रेसने स्वतंत्र मार्ग स्वीकारला. या राजकीय समीकरणांमुळे मुंबईतील मतदारांचा कल विभागला गेला आणि त्याचा फायदा सत्ताधारी गटांना झाला.

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर शिवसेनेकडे वळली होती. मात्र त्याच प्रमाणात शिवसेनेची मते काँग्रेस उमेदवारांना मिळाली नाहीत. हीच बाब लक्षात घेऊन काँग्रेसने सुरुवातीला ‘स्वबळावर निवडणूक’ लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीसोबत आघाडी करण्यात आली. मात्र या युतीचा फारसा सकारात्मक परिणाम निकालात दिसून आलेला नाही.

हे वाचलं का?

    follow whatsapp