शिवसेनेचा बालेकिल्ला भाजपने कसा हिसकावला?

अतिक शेख

Chhatrapati Sambhaji Nagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचा लाजीरवाणा पराभव झालाय. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या शिवसेनांचा सुफडा साफ केला. परिणामी गेल्या 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता आता भाजपने काबीज केली. 115 पैकी 57 जागा जिंकत भाजपने संभाजीनगर महापालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा फडकावलाय.

ADVERTISEMENT

Chhatrapati Sambhaji Nagar
Chhatrapati Sambhaji Nagar
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजीनगरात पराभवाचा धक्का

point

एमआयएमला संभाजीनगरात दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक

point

भाजपात तिकीटवाटपावरून अभूतपूर्व राडा

Chhatrapati Sambhaji Nagar : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं आवडतं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरात शिवसेनेचा लाजीरवाणा पराभव झालाय. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांच्या शिवसेनांचा सुफडा साफ केला. परिणामी गेल्या 25 वर्षांची शिवसेनेची सत्ता आता भाजपने काबीज केली. 115 पैकी 57 जागा जिंकत भाजपने संभाजीनगर महापालिकेवरचा शिवसेनेचा झेंडा काढून भाजपचा झेंडा फडकावलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 13 तर ठाकरेंच्या शिवसेनेला केवळ 6 जागांवर समाधान मानावं लागलं. धक्कादायक म्हणजे तब्बल 33 जागा जिंकत एमआयएम भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलाय. त्यामुळे आता कधीकाळी बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला अशी ओळख असणाऱ्या संभाजीनगरात शिवसेना सत्तेतून हद्दपार झाली आहे.

हे ही वाचा : दोन लग्नांनंतरही पुरुषाचं विवाहित प्रीतीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप, नंतर महिलेचा खून करत मृतदेह पेटीत भरला अन्...

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजीनगरात पराभवाचा धक्का

लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेला संभाजीनगरात जबर पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. त्यानंतर सात माजी महापौरांनी भाजपात प्रवेश केला. यामध्ये विकास जैन, अनिता घोडेले, नंदकुमार घोडेले, कला ओझा, त्रंबक तुपे, विमल राजपूत आणि किशनचंद तनवाणी यांचा समावेश होता. दुसरीकडे अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरेंमधील वादाचा फटका ठाकरेंच्या शिवसेनेला निवडणुकीत बसला. राशीद मामु यांच्या प्रवेशावरून झालेल्या भांडणामुळे संपूर्ण निवडणुकीत पक्षाचा प्रचार वादात राहिला.

एमआयएमला संभाजीनगरात दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेबद्दल बोलायचं झाल्यास सत्तेत असताना शिंदेंसेनेला संभाजीनगरात सपाटून मार खावा लागला. 13 जागा जिंकल्या, परंतु भाजपने बहुमत मिळवल्याने शिवसेनेला सत्तेत सामील होण्याची कोणतीही संधी मिळणार नाहीए. पालकमंत्री संजय शिरसाट आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यातील वादाचा फटका शिवसेनेला बसल्याची चर्चा संभाजीनगरात आहे. लोकसभा आणि विधानसभेत पराभव झाल्यानंतर एमआयएमने पालिका जिंकण्यासाठी चांगलाच जोर लावला होता. खुद्द असदुद्दीन ओवैसी यांनी संभाजीनगरात मुक्काम ठोकून प्रचार केला. परिणामी एमआयएमला संभाजीनगरात दुसऱ्या क्रमांकाचे नगरसेवक निवडून आणता आले.

भाजपात तिकीटवाटपावरून अभूतपूर्व राडा

यंदाच्या संभाजीनगर महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना, भाजप किंवा शिंदेंच्या शिवसेनेत मोठे राडे झाल्याचं पाहायला मिळालं होतं. भाजपात तिकीटवाटपावरून अभूतपूर्व राडा झाला, नाराज इच्छूकांनी मंत्री अतुल सावेंची गाडी अडवली. तर स्थानिक खासदार भागवत कराड यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं करण्यात आली होती. दुसरीकडे तिकीट वाटपापासून तर निवडणूक संपेपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेत अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp