दोन लग्नांनंतरही पुरुषाचं विवाहित प्रीतीसोबत लिव्ह-इन रिलेशनशिप, नंतर महिलेचा खून करत मृतदेह पेटीत भरला अन्...

मुंबई तक

crime news : एका व्यक्तीनं दोन विवाह केले होते, तो एका विवाहितेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रेयसीचं नाव प्रीती असे आहे. तर नवऱ्याचे नाव राम सिंग असे आहे. राम सिंगने लिव्हमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून पेटीत भरला, नंतर मृतदेहाचं दहन करून पेटीत भरला

point

पेटी पाहून लोडर चालकाला भलताच संशय...

Crime News : उत्तर प्रदेशातील झाशीमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका व्यक्तीनं दोन विवाह केले होते, तो एका विवाहितेसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. प्रेयसीचं नाव प्रीती असे आहे. तर नवऱ्याचे नाव राम सिंग असे आहे. राम सिंगने लिव्हमध्ये राहणाऱ्या विवाहित महिलेची हत्या केल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस तपासातून दिसून आले की, ही घटना 8 जानेवारी रोजी घडली होती. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे. 

हे ही वाचा : नोकरीवरून घरी परतत होता तरुण, नियंत्रण सुटून कार पडली पाण्यात, अपघातात सॉफ्टवेअर इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू

मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून पेटीत भरला, नंतर मृतदेहाचं दहन करून पेटीत भरला

या प्रकरणात हत्येनंतर राम सिंगने मृतदेह ताडपत्रीत गुंडाळला. नंतर त्याने एक पेटी खरेदी केली आणि लाकूड गोळा केले. त्याने संबंधित मृतदेह हा पेटीत भरला आणि नंतर जाळून टाकला. मृतदेहाचे दहन केल्यानंतर त्याने राख फेकून दिल्याचा संशय आहे. राम सिंग हा एवढ्यावरच न थांबता त्याने ठेवलेली पेटी पाण्याने स्वच्छ केली. 

पेटी पाहून लोडर चालकाला भलताच संशय...

राम सिंगने आपल्या मुलीच्या मदतीने ती पेटी आपल्याच दुसऱ्या पत्नीच्या घरी पाठवली होती. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले, पेटी पाहून लोडर चालकाला भलताच संशय आला. त्याने याबाबत पोलिसांना सांगितले होते. पोलिसांनी त्याच्या मुलासह दोन आरोपींना ताब्यात घेत चौकशी सुरु केली, नंतर गूढ उलगडल्याचं चित्र समोर आले. सध्या राम सिंगचा शोध सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.  

संबंधित प्रकरणी अधीक्षक प्रीती सिंग म्हणाल्या की, एका व्यक्तीने पीआरव्ही कंट्रोल रूमला माहिती दिली की, कोतवाली परिसरात त्याच्या लोडर वाहनातून काही लोकांना एक पेटी उतरवली होती. संबंधित प्रकरणात संबंधित पेटीत काही संदिग्ध समान असल्याचा संशय होता. त्यानंतर पोलिसांनी त्याच ठिकाणी धाव घेतली. तेव्हा पोलिसांनी पेटी उघडली असता, त्यात मृतदेह जळलेल्या अवस्थेत तसेच कोळसा आणि इतर काही वस्तू आढळून आल्या होत्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp