Arvind Kejriwal : CM केजरीवालांना अटक, उद्धव ठाकरेंना 'मेसेज'
Arvind Kejriwal Uddhav Thackeray : अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आल्यानंतर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी एक सूचक पोस्ट केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
अरविंद केजरीवाल यांना अटक
महाराष्ट्रात राजकारणात खळबळ
उद्धव ठाकरे भाजपचं पुढचं लक्ष्य?
Arvind Kejriwal Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यांच्या अटकेचे पडसाद महाराष्ट्रासह देशभरात उमटले आहेत. पण, केजरीवालांच्या अटकेतून उद्धव ठाकरेंना काय मेसेज, अशी चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या नेत्यानेही पोस्ट केल्याने या चर्चेला हवा मिळाली आहे.
अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली. दोन तास चौकशी केल्यानंतर ईडीने अटकेची कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजप आमदाराचं ट्विट, ठाकरेंकडे बोट
अरविंद केजरीवाल यांना अटक झाली. त्यानंतर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी एक पोस्ट केली. "भ्रष्टाचाराच्या कारनाम्यांमुळे विद्यमान मुख्यमंत्री तुरुंगात जाऊ शकतो, तर टक्केवारीवाला माजी मुख्यमंत्री पण जाऊ शकतो."
हेही वाचा >> "माढ्यातील एक खासदार पडला, तर...", रामराजे निंबाळकरांचा भाजपला इशारा

आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंचे नाव घेतलेले नसले, तरी त्यांचा रोख ठाकरेंकडेच आहेत. उद्धव ठाकरे यांचे सरकारवर भाजपकडून भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुलीच्या प्रकरणात अटक झाली होती.










