Big Breaking: महापत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी ED चा दणका, आदित्य ठाकरेंचा राईट हँड सूरज चव्हाणला अटक

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

आदित्य ठाकरेंचा राईट हँड सूरज चव्हाणला ED कडून अटक
आदित्य ठाकरेंचा राईट हँड सूरज चव्हाणला ED कडून अटक
social share
google news

Suraj Chavan Arrest: मुंबई: कोव्हिड काळातील खिचडी घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ED) ने आज (17 जानेवारी) रात्री उशिरा मुंबईत एक मोठी कारवाई केली आहे. शिवसेना UBT चे नेते आदित्य ठाकरे यांचे राईट हँड समजले जाणारे सूरज चव्हाण यांना ईडीने अटक केली आहे. (big breaking shiv sena ubt aaditya thackerays right hand suraj chavan arrested by ed in case of khichdi scam in covid period)

ADVERTISEMENT

खिचडी घोटाळा प्रकरणी हे मागील काही महिन्यांपासून बरेच चर्चेत होतं. याच प्रकरणी ईडीने जून महिन्यात सूरज चव्हाण यांच्या घरावर छापाही मारला होता. ईडीकडून सूरज चव्हाण यांना करण्यात आलेली ही अटक एकप्रकारे आदित्य ठाकरे यांनाच मोठा धक्का मानला जात आहे. सूरज चव्हाण यांची अटक हा एकप्रकारे थेट आदित्य ठाकरे यांना इशारा देण्यात आल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकरांना होती माहिती?

खिचडी घोटाळा प्रकरणात आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण आणि अमोल कीर्तिकर यांची काही महिन्यांपूर्वीच चौकशी करण्यात आली होती. फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला कंत्राट मिळवून देण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने प्रभाव टाकला, याबद्दल चौकशी करण्यात आली होती.

हे वाचलं का?

खिचडी घोटाळा नेमका काय?

कोरोना काळात राज्यात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. त्यावेळी रोजगार बंद पडल्याने अनेक परराज्यातील मजूर हे हवालदिल झाले होते. त्यावेळी त्यांना दिलासा देण्यासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने खिचडी वाटप सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ज्यानुसार स्थलांतरीत मजुरांना 300 ग्रॅम खिचडी द्यायची होती. पण, डब्यात फक्त 100 ग्रॅम खिचडीच भरली गेली. असा आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे.

हे ही वाचा>> Shiv Sena UBT: एकनाथ शिंदे स्टेजवरच पडलेले ठाकरेंच्या पाया, ‘तो’ Video दाखवला अन्…

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याने सांगितले होते की, खिचडी भरणाऱ्या कर्मचाऱ्यांनी चौकशीत सांगितलं की, प्रत्येक डब्यात 300 ग्रॅम ऐवजी केवळ 100 ग्रॅम खिचडीच भरली जात होती. ज्याची माहिती अमोल कीर्तिकरांना होती. असाही दावा करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

खिचडीसाठी फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसला मिळालेले कोट्यवधी रुपयांचं कंत्राट

दरम्यान, त्यावेळी बीएमसीने खिचडीच्या कंत्राटापोटी मशीलकर यांच्या फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस कंपनीला 8.64 कोटी रुपये दिले होते. तर फोर्स वन मल्टी सर्व्हिसेसने त्यातील 4.2 कोटी हे स्नेहा केटरर्सला दिले होते. याशिवाय 84 लाख रुपये गोल्डन स्टार बँक्वेट हॉलला दिलेले. यात कंपनीला तब्बल 3.64 कोटींचा नफा झाला होता. याच सगळ्या प्रकरणावरून ईडीने आता सूरज चव्हाण यांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

महापत्रकार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी ED कडून कारवाई

शिवसेना UBT ने काल (16 जानेवारी) मुंबईत महापत्रकार परिषद घेत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलेल्या निकालावर बरीच टीका केली होती. यावेळी शिवसेनेची अतंर्गत निवडणूक, राष्ट्रीय कार्यकारिणी आणि नेत्यांची निवड या सगळ्याचे व्हिडीओ देखील दाखवले होते.

हे ही वाचा>> Shiv Sena UBT: ‘त्या’ Video नंतर उद्धव ठाकरे प्रचंड संतापले, नार्वेकर-शिंदेंना म्हणाले; ‘तुम्ही…’

ज्यावरून अनेक सवाल हे शिंदेच्या शिवसेनेबाबत उपस्थित केले जाऊ लागले. मात्र, या पत्रकार परिषदेला 24 तास पूर्ण होतात तोच ईडीने ठाकरे गटाच्या सूरज चव्हाणांवर केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT