Pankaja Munde : शिवशक्ती परिक्रमा यात्रा काय? पंकजा मुंडे कोणत्या जिल्ह्यात फिरणार?
Pankja Munde : पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली आहे. मात्र त्यांनी ही यात्रा नसून जनता जनताजनर्दनासाठी मी यात्रेच्या निमित्ताने निघाल असल्याचे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Pankja Munde : भक्ती आणि शक्तीच्या संगमाचा अलौकिक अनुभव घेत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा (Shivshakti parikrma yatra) सुरु केली आहे. शिवशक्ती परिक्रमा याविषयी बोलतान त्यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांचा आग्रह, भेटीगाठी आणि सामाजिक बांधिकलकीच्या दृष्टीकोनातून मी शिवशक्ती परिक्रमा यात्रेकडे पाहते असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही परिक्रमा यात्रा ही सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीकोनातून काढली गेली आहे. त्यामुळे यामाध्यमातून कोणत्याही पक्षाचा अजेंडा नाही त्याच बरोबर याचा परिक्रमा यात्रेचा आणि निवडणुकीचा कोणताही संबंध नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही परिक्रमा यात्रा 5 हजार किमीचा प्रवाचा पूर्ण करणार आहे.
ADVERTISEMENT
जनतेबरोबरही संवाद
पंकजा मुंडे यांची ही शिवशक्ती परिक्रमा यात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. पुढील आठ दिवस पंकजा मुंडे यांच्याकडून राज्यातील काही जिल्हे पिंजून काढणार आहेत. यावेळी त्या धार्मिकस्थळे आणि शक्तीपीठांना भेट देणार असून जनतेबरोबरही संवाद साधणार आहेत.
हे ही वाचा >> Maratha Morcha : “हा जनरल डायर कोण?”, शिवसेनेचं (UBT) शिंदेंना चॅलेंज
संघर्ष यात्रेची आठवण
पंकजा मुंडे यांच्या या शिवशक्ती परिक्रमा यात्रेमुळे त्यांचे वडिल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या 1994 मध्ये काढलेल्या संघर्ष यात्रेची यावेळी आठवण काढली जात आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या संघर्ष यात्रेमुळे त्यानंतर काँग्रेसच सरकारला पायउतार व्हावं लागले होते.
हे वाचलं का?
शिव आणि शक्तीच्या दर्शनाबरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी ही परिक्रमा आहे. जनतेचे हे प्रेम अबाधित राहो.
(२/२)#ShivShaktiParikrama #शिवशक्ती_परिक्रमा #ShivShakti #शिवशक्ती #Grushneshwar #Jyotirlinga #घृष्णेश्वर pic.twitter.com/Z0B2W7hRnI— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 4, 2023
जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रेला सुरु करण्यापूर्वी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या वेरूळ (छ. संभाजीनगर) येथील घृष्णेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी शिव-शक्ती परिक्रमा यात्रा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, शिव आणि शक्तीच्या दर्शनाबरोबरच जनता जनार्दनाच्या दर्शनासाठी ही परिक्रमा आहे. जनतेचे हे प्रेम अबाधित राहो अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Raj Thackeray Maratha Morcha : ‘अरे व्वा! तुम्ही काय केलं असतं?’, राज ठाकरे फडणवीसांवर भडकले
योग्य निर्णय घ्यावा लागेल
पंकजा मुंडे यांनी शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरु केली असली तरी त्यांनी राज्यातील घडणाऱ्या घटना घडामोडींविषयी चिंता व्यक्त केली आहे. चाललेल्या मराठा आंदोलनाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, मराठा आंदोलनाविषयी चाललेल्या घटनेकडे मी खूप चिंतेने पाहते आहे. कारण आंदोलनकर्त्यांच्या मनात प्रचंड उद्विगनता आहे. त्यामुळे मराठा आंदोलनाचा विषय मार्गी लावण्यासाठी योग्य निर्णय झाला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT