पाकिस्तान खोटेपणा करत वेड्यात काढतंय, विक्रम मिसरी यांनी केली पोलखोल

मुंबई तक

operaton sindoor : पाकिस्तानचा खोटेपणा उघडा पडला आहे. यावेळी भारताचे परराष्ट्र सचिव मंत्री विक्रम मेस्त्री यांनी पाकिस्तानचे खोटे मनसुबे बाहेर काढले आहेत. कोणीही पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांना बळी पडू नका असा दावा केला.

ADVERTISEMENT

पाकिस्तानचा खोटारडेपणा विक्रम मेस्त्रीनं उघडा पाडला
पाकिस्तानचा खोटारडेपणा विक्रम मेस्त्रीनं उघडा पाडला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देश तनावाच्या परिस्थितीचा सामना करत आहेत.

point

ऑपरेश सिंदूरनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेवर तनावाचं वातावरण आहे.

point

युद्धादरम्यान पाकिस्तानने केलेले दावे हे खोटे असल्याचे परराष्ट्र सचिव मंत्री विक्रम मिसरी म्हणाले.

operaton sindoor : भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत दोन्ही देश तनावाच्या परिस्थितीचा सामना करत आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत-पाकिस्तान सीमेवर तनावाचं वातावरण आहे. हे युद्ध थांबावं अशी जगभरातील देशांनी आशा व्यक्त केलीय. शुक्रवारी मध्यरात्री  पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. सांगण्यात येतंय की, भारतानं एकूण 6 बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला केला. यालाच प्रत्युत्तर देण्यात भारताला यश प्राप्त झालं. यानंतर आता पाकिस्तानने सर्व एअरबेस बंद केले. 

दुसऱ्या बाजूला पाकिस्ताननं भारताविरोधात "ऑपरेशन बनयान उल मरसूस" सुरू केलंय. याद्वारे पाकिस्तानने देशाच्या सुरक्षेत वाढ व्हावी, असा त्यांनी दावा केलाय. दोन्ही देशांमधील असणाऱ्या तनावामुळे दोन्ही देशांत अस्थिरता निर्माण होत आहे. याचा अधिक परिणाम देशांच्या सीमेवरील भागांमध्ये सर्वाधिक जाणवत आहे. 

हेही वाचा : रात्र वैऱ्याची... रात्रभर सुरू होते पाकिस्तानचे हल्ले, तुमच्या-आमच्या रक्षणासाठी जीवपाड लढतयं लष्कर!

काय म्हणाले विक्रम मिसरी? 

अशातच परराष्ट्र सचिव मंत्री विक्रम मेस्त्री म्हणाले की, आपण पाहिलंच असेल की, पाकिस्तानद्वारे करण्यात आलेले अनेक दावे हे खोटे ठरलेत. ही सर्व माहिती पाकिस्तानी संस्था पसरवत असल्याचं सांगण्यात येतंय. त्यांनी विविध लष्करी मालमत्ता नष्ट केल्याचा खोटा दावा केला. सिरसा, सुरतगड, आदमपूरमधील हवाई दलाच्या तळांचा नायनाट केल्याचा खोटा दावा केलाय. मी विनंती करतो की, या सर्व खोट्या दाव्यांना कोणीही बळी पडू नका. 

हे वाचलं का?

    follow whatsapp