नांदेड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेत जीवन संपवलं, प्रकरण राष्ट्रवादीच्या नेत्याशी कनेक्टेड
Nanded News : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेत जीवन संपवलं. गळफास घेण्याचं कारण समोर आले आहे. वसतिगृह चालकाने विद्यार्थिनीला फी भरण्यावरून त्रास दिल्याने ही घटना घडली होती. संबंधित वसतीगृहाचा मालक हा राष्ट्रवादीचा नेता होता, अशी माहिती आहे. ही घटना नांदेड शहरात घडल्याचे सांगण्यात येत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
आकांक्षा गायकवाडने गळफास घेत संपवलं जीवन
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप
Nanded News : कुवरचंद मंडले - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेत जीवन संपवलं. गळफास घेण्याचं कारण समोर आले आहे. वसतिगृह चालकाने विद्यार्थिनीला फी भरण्यावरून त्रास दिल्याने ही घटना घडली होती. संबंधित वसतीगृहाचा मालक हा राष्ट्रवादीचा नेता होता, अशी माहिती आहे. ही घटना नांदेड शहरात घडल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय 25) असे आहे.
हे ही वाचा : लग्नात हुंड्यात गाडी दिली नाही, संतापलेल्या पतीने बायकोसह चार महिन्याच्या बाळावर केला अॅसिड हल्ला
आकांक्षा गायकवाडने गळफास घेत संपवलं जीवन
घडलेल्या घटनेनुसार, शुक्रवारी दुपारी हडको परिसरात आकांक्षा गायकवाडने गळफास घेत जीवन संपवलं. अजित पवार गटाचे नेते प्रदेश चिटणीस,माजी विरोधी पक्षनेता जीवन घोगरे हे तिला अनेकदा मानसिक त्रास देत होते, याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला. शुक्रवारी रात्री ग्रामीण पोलिसांनी राष्ट्रवादीच्या नेत्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला, या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आकांक्षा गायकवाड ही हिडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथिक महाविद्यालयात बी एच एम एस द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. आई वडील मजुरीचे काम करतात. महाविद्यालयाच्या काही अंतरावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचे सरचिटणीस, माजी विरोधी पक्ष नेते जीवन घोगरे पाटील यांचं निवास आहे. त्यांनी त्यांच्या इमारतीत कॉट बेसेसवर केलेला हा वसतिगृह आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप
मागील दोन वर्षांपासून मृत आकांक्षा ही कॉटबेसेसवर राहत होती. शुक्रवारी दुपारी ती खोलीत पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. दुसरीकडे मयत तरुणीच्या कुटुंबियांनी वसतिगृह चालक तसेच राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यावर गंभीर आरोप केले.










