रात्र वैऱ्याची... रात्रभर सुरू होते पाकिस्तानचे हल्ले, तुमच्या-आमच्या रक्षणासाठी जीवपाड लढतयं लष्कर!
India Pakistan tension : पाकिस्तानने केलेला ड्रोन हल्ला उधळून लावत भारताने 4 एअरबेसवर हल्ला केला. पाकिस्ताननं फतेह-1 द्वारे गोळीबार केला. पहाटेपर्यंत हे हल्ले सरूच होते.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरूय.

पाकिस्ताननं अनेक ड्रोन्सनं भारतावर हल्ला केलाय.

भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला करत प्रत्युत्तर दिलंय.
India Pakistan War: नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानदरम्यान गेल्या तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. काल (9 मे) रात्रीपासून पाकिस्ताननं अनेक ड्रोन्सनं भारतावर हल्ला करणं सुरू ठेवलं आहे. त्याला भारताच्या हवाई दलानं हाणून पाडलं. त्यानंतर शुक्रवारी पाकिस्ताननं भारतावर 26 ठिकाणी हल्ले केले होते. याच प्रत्युत्तरात भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसवर हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिलं आहे. अशातच भारतावर पाकिस्तानकडून मिसाईलनं हल्ला केला गेला.
रात्रभर पाकिस्तानकडून हल्ले
शुक्रवारी रात्रीच्या सुमारास पाकिस्तानकडून फतेह-1 या मिसाईलनं हल्ला करण्यात आला. जे भारताने हवेतच नष्ट केलं. पाकिस्तानातील जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात आणि राजस्थानमधील काही भागांना सातत्याने लक्ष्य करण्यात येत आहे. दरम्यान, रात्रीपासून पहाटेपर्यंत पाकिस्तानकडून सातत्याने हल्ले करण्यात येत होते. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हा परतवून लावला आहे.
हे ही वाचा>> मोठी बातमी! पाकिस्तानची आता खैर नाही...भारताने एअर मिसाईल सिस्टम केलं सुरु, नेमका प्लॅन काय?
आज (10 मे 2025) रोजी सकाळीच भारतानं पाकिस्तानची राजधानी असणाऱ्या इस्लामाबाद येथे मिसाईलनं हल्ला केला आहे. रात्री काही वृत्तमाध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सैन्याचे जनरल अहमद शरीफ चौधरी म्हणाले की, भारतानं चार एअरबेसवर हवाई हल्ला केला आहे.
आज सकाळी नेमकं काय झालं?
जम्मू -काश्मीरधील हवाई दलाला लक्ष्य करण्यात पाकिस्तानला अपयश आलं. पाकिस्तानकडून रात्री झालेल्या हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरची सत्य परिस्थिती दर्शवणारे काही फोटो समोर आले आहेत. त्याचप्रमाणे गुजरातच्या कच्छमध्येही पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. त्यानंतर भारतानं तो हल्ला हाणून पाडला. पठाणकोटमध्ये सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात स्फोट झाले. याच प्रत्युत्तरात तोफगोळांच्या माध्यमातूनही हल्ले करण्यात आले होते.
हे ही वाचा>> Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानने सुरु केलं 'बुनयान उल मरसूस', नेमका अर्थ काय?
तसेच अमृतसरमध्येही तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे गोळीबार सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर आता अमृतसर प्रशासनानं रेड अलर्ट जारी केला आहे. लोकांना घरीच थांबण्याचं आवाहन केलंय. त्याचप्रमाणे फिरोजपूर आणि भठिंडात मोठ्या प्रमाणत हल्ले करण्यात आले. तसेच सायरनही सुरूच असल्याचं सांगण्यात येतं आहे.
दरम्यान, पहाटे 5.20 वाजताच्या सुमारास श्रीनगर, एयर पोर्टच्यानजीक तर पहाटे 4.50 वाजता बारामुल्ला आणि उधमपुरमध्ये हल्ल्याचे आवाज ऐकू येत होते. गोळीबार सुरू असल्याचेही आवाज ऐकू येत होते. यामुळे जम्मूच्या काही शहरी भागांना मोठ्या प्रमाणात गोळीबारामुळं नुकसान झालं आहे. तर काही दुकानांचं नुकसान झालं आहे, असं सांगण्यात येत आहे.