अल्पवयीन मुलीचे जत्रेतून अपहरण, औषध पाजून आळीपाळीने सामूहिक अत्याचार, कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली

मुंबई तक

crime news : एका अल्पवयीन मुलगी जत्रेत गेली होती, त्याचदरम्यान तिघांनी मिळून मुलीवर सामूहिक अत्याचार केला. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन नामांकित आणि एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात बोलावले आणि त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले.

ADVERTISEMENT

crime news
crime news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

झोका खेळताना अल्पवयीन मुलीचं जत्रेतून अपहरण 

point

औषध पाजून आळीपाळीने अत्याचार 

Crime News : एका अल्पवयीन मुलगी जत्रेत गेली होती, त्याचदरम्यान तिघांनी मिळून संबंधित मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. पीडितेच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन नामांकित आणि एरा अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दखल केला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना चौकशीसाठी ताब्यात बोलावले आणि त्यांना अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात घडली आहे. 

हे ही वाचा : पुणे : माधुरी हत्तीणीनंतर 20 बिबट्यांना गुजरातच्या वनतारा अभयारण्यात हलवलं

झोका खेळताना अल्पवयीन मुलीचं जत्रेतून अपहरण 

अल्पवयीन मुलगी तिच्या कुटुंबातील महिलांसोबत गेली होती, ती झोका देखील खेळत होती. त्याचवेळी तिचे कुटुंबीय देखील झोका खेळत होते. तिच्या कुटुंबियांनी सांगितलं की, झोका खेळताना तिला चक्कर आली आणि ती तिथेच थांबली होती. त्या ठिकाणी तिच्या कुटुंबातील काही महिला आल्या आणि त्याठिकाणी मुलगी नव्हती. 

औषध पाजून आळीपाळीने अत्याचार 

आरोप असा की, यादरम्यान मुलीचं अपहरण करत तिला कारमध्ये बसवून नेल्याचा आरोप आहे. आरोपींनी मुलीला औषध पाजले किंवा श्वास घेतला आणि तिला आपल्यासोबत घेऊन गेले, असे वृत्त आहे. नंतर दोन्ही आरोपींनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, इतर दोन आरोपीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेचा विनयभंग केला आणि तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. 

कुटुंबियांनुसार, जेव्हा त्यांची मुलगी बराच वेळ सापडली नाही तेव्हा त्यांनी तिचा शोध सुरु केला. नंतर ती घटनास्थळावरून सुमारे पाच किमी अंतरावर अवस्थेत आढळून आली. पीडितेनं तिच्या कुटुंबाला या घटनेची संपूर्ण माहिती दिली. तेव्हा कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. सुरुवातीला पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. यादरम्यान, पोलीस आणि कुटुंबीयांच्यात देखील हमरीतुमरी झाली. संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

हे वाचलं का?

    follow whatsapp