पुणे : माधुरी हत्तीणीनंतर 20 बिबट्यांना गुजरातच्या वनतारा अभयारण्यात हलवलं

मुंबई तक

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये वनविभागाच्या हद्दीतील मानव-बिबट्यांच्या संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच बिबट्यांना पकडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यानुसार, आज  (7 मार्च) रोजी पहिल्या टप्प्यात 20 बिबट्यांना गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती  जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिली आहे.

ADVERTISEMENT

pune news
pune news
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मानव-बिबट्यांमधील संघर्षामुळे जुन्नर व शिरुर तालुक्यातील बिबटे वनतारात

point

बिबट्या वनतारा केंद्रात रवाना

Pune News : रायचंद शिंदे - पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये वनविभागाच्या हद्दीतील मानव-बिबट्यांच्या संघर्षात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. अशातच बिबट्यांना पकडण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. त्यानुसार, आज  (7 मार्च) रोजी पहिल्या टप्प्यात 20 बिबट्यांना गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले होते. या प्रकरणाची माहिती  जुन्नर वन विभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे यांनी दिली आहे.

हे ही वाचा : नांदेड : वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने वसतीगृहातच गळफास घेत जीवन संपवलं, प्रकरण राष्ट्रवादीच्या नेत्याशी कनेक्टेड

मानव-बिबट्यांमधील संघर्षामुळे जुन्नर व शिरुर तालुक्यातील बिबटे वनतारात

मानव-बिबट्यांमधील संघर्षामुळे जुन्नर व शिरुर तालुक्यातील काही बिबट्यांना पकडून त्यांना माणिकडोह बिबट निवारा केंद्रात ठेवण्यात आले होते. संबंधित केंद्राची मर्यादा ही 50 इतकी मर्यादीत असल्याने अतिरिक्त बिबट्यांचे इतर योग्य ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते. यासाठी प्रस्ताव Central Zoo Authority, नवी दिल्ली यांच्याकडे पाठवण्यात आला होता. 

या प्रस्तावाला 20 डिसेंबर रोजी मंजुरी मिळाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरातमधील ग्रीन्स झुलॉजीकल रेस्क्यू रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन सेंटर वनतारा जामनगर येथील 25 सदस्यीय पथक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव श्रीवास्तव यांच्या नेतृत्वाखाली 6 
मार्च रोजी जुन्नर येथे दाखल झाले होते. 

हे ही वाचा : पुणे : दिवेघाट पायथ्याशी आढळला महिलेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह, शारीरिक संबंधाला प्रतिकार केल्याने हत्या

बिबट्या वनतारा केंद्रात रवाना

पहिल्या टप्प्यात आज 10  नर व 10 मादी अशा 20 बिबट्यांना वातानुकूलित आणि सुसज्ज रेस्क्यू व्हॅनद्वारे सुरक्षितपणे वनतारा केंद्रात रवाना करण्यात आले. ही संपूर्ण प्रक्रिया वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जुन्नर वनविभागातील अधिकारी-कर्मचारी तसेच वाइल्डलाइफ SOS संस्थेच्या सहकार्याने पार पडली होती. संबंधित प्रकरणात वनविभागाकडून उपाययोजना राबवण्यात येत असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp